Shirgaon Lairai Jatra
Shirgaon Lairai Jatra  Dainik Gomantak
गोवा

शिरगावात लईराईच्या जत्रेला उत्साहात प्रारंभ

दैनिक गोमन्तक

डिचोली : देश-विदेशात प्रसिद्धीस पावलेली आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगावच्या श्री लईराई देवीची जत्रेला मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात सुरवात झाली आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा देवीचे 'अग्निदिव्य' प्रत्यक्ष अनुभवण्याचा योग हजारो भाविकांना मिळणार आहे. रखरखत्या निखाऱ्यातून अग्निप्रवेश करण्यासाठी व्रतस्थ धोंड भक्तगणही सज्ज झाले आहेत. आज (गुरुवारी) सकाळपासूनच भाविकांची पावले श्री लईराई मातेच्या दर्शनासाठी शिरगावात वळू लागली आहेत.

हा जत्रोत्सव परंपरेनुसार पाच दिवस चालणार आहे. 'कोविड' महामारीमुळे दोन वर्षांच्या निर्बंधानंतर यंदा परंपरेनुसार जत्रा साजरी होणार असल्याने गावात तसेच भक्तगणांमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले असून, भक्तांच्या हाकेला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या श्री देवी लईराईच्या दर्शनाची भक्तांना आस लागून राहिली आहे. 'कोविड' स्थिती नियंत्रणात असली, तरी 'कोविड'च्या मार्गदर्शक नियमांचे पालन करण्यात येत आहे.

' कोविड' महामारी संकटामुळे दोन वर्षे श्री लईराई देवीची जत्रा मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली नव्हती. त्यामुळे भक्तांना देवीच्या अग्निदिव्याची अनुभूती घेण्याची संधी मिळाली नव्हती. 'कोविड' ची स्थिती नियंत्रणात असल्याने दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा पुर्वीप्रमाणेच जत्रा उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याने यंदा शिरगावात धोंड मिळून भक्तांचा महापूर लोटण्याचा अंदाज आहे. जत्रेचे वैशिष्ट्य असलेले 'होमकुंड'ही रचण्यात आले आहे. मध्यरात्री जयघोषात वाजतगाजत देवीचे होमकुंड स्थळी आगमन होणार आहे. देवीकडून होमकुंडात चनरज्योत टाकल्यानंतर क्षणार्धाथ होमकुंड पेट घेते. होमकुंड पेटल्यानंतर पहाटेपर्यंत अग्निदिव्याचा थरार चालणार आहे. धोंड भक्तगणांसह देवी अग्निदिव्य करणार आहे.

जत्रेनिमित्त संपूर्ण शिरगाव गावात मंगल आणि भक्तीमय वातावरण पसरले आहे. अस्नोडा-शिरगाव रस्ता आदीठिकाणी कमानी उभारून आरास करण्यात आली आहे. श्री लईराई तसेच अन्य मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रंगरंगोटी करून घरांवरही रोषणाई करण्यात आली आहे. खाजे, हॉटेल्स, रेडिमेड कपडे आदी सामानांची दुकानेही थाटण्यात आली आहेत. यंदा फेरीत मात्र 'गोबी मंचुरियन'चा एकही स्टॉल दिसत नाही. अशा प्रकारच्या स्टॉलना जत्रेनिमित्त बंदी घालण्यात आली आहे.

श्री लईराई देवीला मोगरीची फुले प्रिय आहेत. जत्रेला येणारे भाविक देवीला मोगरीच्या कळ्यांच्या माळा अर्पण करतात. त्यामुळे जत्रा काळात शिरगावात मोगरीच्या फुलांना प्रचंड मागणी असते. मोगरीच्या फूल विक्रीतूनच शिरगावात लाखो रुपयांची उलाढाल होत असते. मोगरीचे कळे विकणारे विक्रेते शिरगाव गावात दाखल झाले आहेत. अवकाळी पावसामुळे यंदा मोगरीच्या फुलांवर परिणाम झाला असल्याने यंदा मोगरीच्या फुलांचे प्रमाण घटल्याचे संकेत मिळत आहेत. तरीदेखील पाच दिवस शिरगावात मोगरीच्या फुलांचा दरवळ पसरणार आहे.

लईराई देवीच्या जत्रेला लाखो भक्तगण उपस्थित राहतात. जत्रा निर्विघ्नपणे साजरी व्हावी. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. प्रमुख ठिकाणी टेहळणी तळ उभारण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसही वाहतुकीवर नियंत्रण ठेवून आहेत. अग्निशमन दल, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवाही तैनात करण्यात आल्या आहेत. डिचोलीचे उपजिल्हाधिकारी, मामलेदार, वरिष्ठ पोलिस अधिकारी परिस्थितीवर नियंत्रण आहेत. 5 मेपासून ही जत्रा सुरु असेल, तर 9 मे पर्यंत कौल उत्सव साजरा केला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT