Famous radio jockey in Goa Pankaj Kudtarkar pass away Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या प्रख्यात रेडिओ जॉकीचा आवाज अनंतात विलीन

खोर्ली-म्हापसा येथील युवा निवेदक पंकज कुडतरकर यांनी रेडिओ मिरचीसाठीही काम केले

दैनिक गोमन्तक

म्हापसा : प्रख्यात रेडिओ जॉकी (Famous radio jockey in Goa) तथा खोर्ली-म्हापसा (Mapusa)येथील युवा निवेदक, जेसी म्हापशाचे माजी अध्यक्ष, म.गो. पक्षाचे माजी युवा अध्यक्ष पंकज मंगलदास कुडतरकर (Pankaj Kudtarkar) यांचे वयाच्या 41व्या वर्षी काल रविवारी सकाळी 9.35 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) म्हापसा येथे निधन झाले. त्यांच्यावर खोर्ली येथील शांतिवन स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंकज हे आरजे म्हणून बरेच लोकप्रिय होते.

रेडिओ मिरचीसाठीही त्यांनी काम केले आहे. तसेच एका चॅनलवरील विविध कार्यक्रमांत त्यांचा सहभाग होता. त्‍यांचे कोकणी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. वाढदिवस, लग्नसोहळे किंवा अन्य कार्यक्रमांतील त्यांचे सूत्रसंचालन लाजवाब होते. पंकज यांनी दोन दिवसांपूर्वी फेस बूकवर ‘‘कुछ नही रखा, आज हैं, कल नहीं, टायम आये तो चुपचाप जाने का; अगले पल का भरोसा नही रे बाबा’’ असा स्टेटस टाकला होता. त्यामुळे स्मशानभूमीच्या परिसरात त्या स्टेटससंदर्भात लोकांनी हळहळ व्यक्त केली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT