BJP Mavin Gudinho Dainik Gomantak
गोवा

माझ्या विरोधात बिनबुडाचे आरोप; माविन गुदिन्हो

मी संरक्षण क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीचा अपमान केलेला नसून मी नौसेना व इतर सेनादलाचा सदैव आदर केलेला आहे; माविन गुदिन्हो

दैनिक गोमन्तक

देशाचे रक्षण करणार्‍या प्रत्येक सैनिकाचा मी आदर करतो, देशाची सीमा सांभाळताना आपल्या सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या देशाचे सच्चे सुपुत्र असल्याची प्रतिक्रिया दाबोळीचे भाजप (BJP) उमेदवार तथा पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली. मी कोणत्याही माजी सैनिका विरुद्ध वाईट बोललेलो नसून हा माझ्यावर केलेला बिनबुडाचा आरोप अशी माहिती गुदिन्हो यांनी दिली. दाबोळी भाजप उमेदवार तथा पंचायत (Panchayat) मंत्री माविन गुदिन्हो यांनी आपल्या मतदार संघाचा जाहीरनामा व पाच वर्षात केलेल्या विकास कामाचे विमोचन केले.

यावेळी त्यांच्यासमवेत दाबोळी भाजप गटाध्यक्ष संदीप सुद, दाबोळी (Dabolim) महिला मोर्चा अध्यक्ष अमिता थोरात, युवा मोर्चा अध्यक्ष संकल्प महाले, नगरसेवक विनोद किनळेकर, दिगंबर आमोणकर, वामन चोडणकर, चिखलीचे उपसरपंच कमला प्रसाद यादव, पंच मारी मास्कारेन्हस, कायतान झेवियर, प्रकाश गावस, मेकलीन गुदिन्हो व इतर मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना भाजप उमेदवार गुदिन्हो म्हणाले मी संरक्षण क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीचा अपमान केलेला नसून मी नौसेना व इतर सेनादलाचा सदैव आदर केलेला आहे.

माझ्या विरोधात विरोधकांनी केलेले बिनबुडाचे आरोप असे गुदिन्हो यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षात दाबोळीतील जनतेची आश्वासने पूर्ण करून दाखवलेली आहे. दाबोळी फर्स्ट हे ध्येय नजरे समोर ठेवून येणाऱ्या काळात या मतदार संघाच्या चौफेर विकास साधणार अशी माहिती माविन गुदिन्हो यांनी दिली.

यावेळी माहिती देताना गुदिन्हो म्हणाले की गोव्यातील पर्यटक टॅक्सीना मीटर बसविताना कोणताही भ्रष्टाचार केला नसून माजीमंत्री मायकल लोबो (Michael Lobo) यांनी केलेला हा माझ्यावरील आरोप एकदम चुकीचा आहे. पर्यटक टॅक्सी व्यवसायिकांची मीटर बसविताना लोबो यांनी त्यांची दिशाभूल केली आहे. भाजप मुळे नाव कमावलेल्या मायकल लोबोला योग्य जागा जनता दाखवणार असल्याची माहिती गुदिन्हो यांनी दिली. दाबोळी विमानतळावर येत्या वर्षात पार्किंगची समस्या सोडवण्यात येईल अशी माहिती शेवटी उमेदवार माविन गुदिन्हो यांनी दिली. यावेळी प्रास्ताविक गटाध्यक्ष संदीप सुद तर सूत्रसंचालन अनिता थोरात यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

30 कोटी रुपयांची फसवणूक, चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांना अटक; मनोरंजन विश्वात खळबळ!

Crime News: 13 वर्षीय मुलीने गळफास घेत संपवलं जीवन, वडिलांचा शाळेतील विद्यार्थ्यावर गंभीर आरोप; वाचा संपूर्ण प्रकरण

'मृतदेह घरी पोहोचवा, क्लब मालकांकडून आर्थिक मदत मिळवून द्या', मृतांच्या मित्रांचा एल्गार

"मैं नहीं खाउंगा, मोटा हो जाउंगा" जयस्वाल केक घेऊन आला, पण 'हिटमॅन'ने दिला नकार Watch Video

Goa Politics:"सकाळी येतो सांगून तुकाराम आलाच नाही!", RGP प्रमुखांनी काँग्रेसला पुन्हा टाळले? युतीचा 'सस्पेन्स' वाढला

SCROLL FOR NEXT