Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: बनावट मतदारयादीचा मडगावात प्रयत्न! कॉंग्रेस नेते आक्रमक; BLA, BLOना निलंबित करण्याची मागणी

Goa Congress: ज्या मतदारांची नावे मतदार यादीत नाहीत किंवा त्यांना सुनावणीसाठी बोलावले असेल तर त्यांनी जरूर सुनावणीस हजर रहावे, कागदपत्रे सादर करावी, असे मत सावियो कुतिन्हो यांनी तमाम मतदारांना केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: जे मतदार भाजपला मते न देण्याची शक्यता आहे, अशांना मतदार यादीतून वगळून बनावट मतदारांना घुसविण्याचे प्रयत्न सघ्या मडगावात प्रयत्न सुरू आहेत. तसेच अशा प्रयत्नांविरोधात आवाज उठविणाऱ्यांना व निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारी करणाऱ्यांविरोधात ‘बीएलए’ व ‘बीएलओ’ खोट्या तक्रारी देत आहेत.

या बीएलए व बीएलओ ना निलंबित करावे, अशी मागणी काँग्रेसचे नेते व शेडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. ‘एसआयआर’ प्रक्रियेसंदर्भात आम्ही जे मतदारांना जागृत करण्याच्या कामाची निवडणूक अधिकारी प्रशंसा करीत असताना दुसऱ्या बाजूने मात्र, आमच्या विरोधात ‘बीएलए’, ‘बीएलओ’ तक्रारी करीत आहेत.

या तक्रारींमागे मडगावचे आमदार दिगंबर कामत हे सूत्रधार आहेत, असेही कुतिन्हो यांनी सांगितले. नावेली येथील जिल्हा ग्रंथालय आवारात कामात हस्तक्षेप केला म्हणून ‘बीएलओ’ दामोदर निगारे यांनी आपल्या विरोधात पोलिस तक्रार केली. मात्र जिल्हा वाचनालयाने ‘आरटीआय’ अंतर्गत दिलेल्या माहितीनुसार वाचनालय आवारात ‘एसआयआर’ प्रक्रिया कधी झालीच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी वेळीच अश्वस्त करणे गरजेचे आहे. जर असे झाले नाही, तर भविष्यात भाजपचा पाडाव अटळ असल्याचे कुतिन्हो यांनी सांगितले. ज्या मतदारांची नावे मतदार यादीत नाहीत किंवा त्यांना सुनावणीसाठी बोलावले असेल तर त्यांनी जरूर सुनावणीस हजर रहावे, आपली कागदपत्रे सादर करावी, असे मत सावियो कुतिन्हो यांनी तमाम मतदारांना केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT