Goa Fake Police Dainik Gomantak
गोवा

Goa Fake Police: तोतया पोलिसांचा सुळसुळाट; भरदिवसा दोघांचे दागिने हातोहात लंपास, ज्‍येष्‍ठांसह महिला 'टार्गेट'वर

Goa Crime: दक्षिण गोव्‍यात तोतया पोलिसांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. त्‍यामुळे सर्वसामान्यांना विशेषत: महिला आणि ज्‍येष्‍ठांना रस्‍त्‍यावरून फिरणे अवघड झाले आहे.

Sameer Amunekar

मडगाव: दक्षिण गोव्‍यात तोतया पोलिसांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. त्‍यामुळे सर्वसामान्यांना विशेषत: महिला आणि ज्‍येष्‍ठांना रस्‍त्‍यावरून फिरणे अवघड झाले आहे. मंगळवारी भरदुपारी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सीआयडी पोलिस अधिकारी  असल्याचे भासवून सदा नाईक (७१) या ज्‍येष्‍ठाच्‍या हातातील ६० हजार रुपये किमतीची अंगठी पळविली. फातोर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चंद्रवाडा  येथे ही घटना घडली. तर, अन्‍य एका घटनेत चिखली-वास्‍को येथे अनुसूया विश्‍‍वनारायण (७५) या ज्येष्ठ महिलेच्या अंगावरील १ लाख ८० हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन पोबारा केला.

फातोर्डा पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सदा  नाईक हे चंद्रवाडा-फातोर्डा येथे दुचाकीवरून जात असताना अचानक अन्य एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्‍यांना अडविले. ‘‘आम्ही सीआयडी ऑफिसर आहोत. हल्ली भुरटे चोर सक्रिय झालेले आहेत. तुमच्या हातातील अंगठी द्या. आम्ही ती कागदात बांधून तुम्हाला देतो’’ असे या भामट्यांनी त्‍यांना सांगितले. त्‍यांच्या बोलण्यावर विश्‍‍वास ठेवून नाईक यांनी आपली अंगठी काढून त्यांच्‍याकडे दिली. ती एका कागदात गुंडाळून त्या तोतयांनी त्यांना परत केली व ते दुचाकीवरून निघून गेले.

मागाहून नाईक यांनी कागद उघडला असता त्यात काहीच नसल्याचे त्‍यांना आढळून आले. आपण फसविलो गेल्‍याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिस निरीक्षक नॅथन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन पाटील पुढील तपास करत आहेत.

कार्मोणा, शिर्ली-धर्मापूर येथेही घडल्‍या आहेत घटना

११ एप्रिल रोजी कार्मोणा येथे अशीच एक घटना घडली होती. ‘हॅल्लो, मी दिल्लीहून पोलिस अधिकारी बोलतोय. तुम्ही मनी लॉड्रिंग प्रकरणात आहात. पोलिस तुमच्या मागावर आहेत. सांगितलेली रक्कम भरा, नाही तर तुम्‍हाला या प्रकरणात अडकवू’ अशी धमकी फुर्तादो दाम्पत्याला देऊन त्यांना साडेचार लाखांना गंडा घालण्‍यात आला होता.

तर, अन्‍य एक घटना ७ मे रोजी भरदिवसा शिर्ली-धर्मापूर येथील राष्ट्रीय हमरस्‍त्‍यावर घडली होती. मडगाव मासळी मार्केटात मासळी पुरवठा करून परत जात असताना मूळ कारवार जिल्ह्यातील मुर्डेश्‍‍वर येथील श्रीधर मोगेर या वाहनचालकाकडून ४ लाख ८३ हजार रुपये घेऊन दोन तोतया पोलिसांनी पोबारा केला होता.

१.८० लाखांचे दागिने पळविले

चिखली येथील अनुसूया विश्‍‍वनारायण या काल मंगळवारी सकाळी बाजारसाठी गेल्या होत्या. त्‍यानंतर त्‍या घरी चालत निघाल्या. तेव्हा तेथे आलेल्या दोघांनी त्‍यांना थांबवून आपण पोलिस असल्‍याचे सांगितले.

तसेच चोरट्यांचा वावर वाढल्‍याने अंगावरील दागिने काढण्यास सांगितले. विश्‍वास ठेवून अनुसूया यांनी अंगावरील १ लाख ८० हजार रुपयांचे दागिने काढून त्या अज्ञातांच्या हाती दिले. दागिने हाती पडताच तोतया पोलिसांनी ते कागदाच्या तुकड्यात गुंडाळले आणि अनुसूयाकडे देऊन दुचाकीसह पोबारा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: अमित पाटकरांच्या तक्रारीवर आमदार कार्लुस फेरेरा हसले; म्हणाले, 'ते बालिश आणि इमॅच्युर कृत्य'

पेपरफुटी प्रकरणातील प्राध्यापकाचा जीवन संपविण्याचा प्रयत्न, गोव्यात सोलर - इलेक्ट्रिक क्रूझ बोटीचे उद्धाटन; वाचा ठळक बातम्या

Annabhau Sathe: अण्णांचा रशिया दौरा कसा होता? तेथील धर्म, वर्ण, स्त्री समानता याबाबत त्यांनी काय निरीक्षण नोंदवले?

Murder Trial: मांगोरहिल - वास्को खून प्रकरणात अझीम शेख दोषी; सोमवारी काय सुनावली जाणार शिक्षा?

'कौशल्याधारित हरित रोजगार भविष्याची गरज'; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या संचालक मिचिको मियामोतो

SCROLL FOR NEXT