Arrest Dainik Gomantak
गोवा

खोटी कागदपत्रं वापरून घेतला पासपोर्ट, गोव्यात करायची सलूनमध्ये काम; फिलिपिन्स महिलेसह स्थानिकाच्या आवळल्या मुसक्या

Philippines Woman Arrested in Goa: तपासादरम्यान महिला कोणत्याही वैध व्हिसा किंवा सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय गोव्यात राहत असल्याचे उघड झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: बनावट नाव आणि खोटी कागदपत्रे सादर करून भारतीय पासपोर्ट मिळवल्याप्रकरणी गुन्हे शाखेने ४१ वर्षीय फेड्रिको पिनापिन मोरेनो या फिलिपिन्सच्या महिलेला व तिला मदत करणाऱ्या एका स्थानिक व्यक्तीला अटक केली. तिने ‘एरिका अचुमी’ या नावाने बनावट पासपोर्ट मिळवला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला गोव्यातील पर्वरी येथील एका सलूनमध्ये हेअर स्टायलिस्ट म्हणून काम करत होती. तिने प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय पणजी येथे खोटी माहिती देऊन आणि मूळ कागदपत्रे लपवून भारतीय पासपोर्ट मिळवल्याची तक्रार प्राप्त झाली होती.

या तक्रारीच्या आधारे गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवून तिला अटक केली. तपासादरम्यान महिला कोणत्याही वैध व्हिसा किंवा सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय गोव्यात राहत असल्याचे उघड झाले. तिने गोव्यातील पासपोर्ट कार्यालयातून पासपोर्ट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेतला होता.

या गुन्ह्यात तिला विनीत बांदिवडेकरने मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बांदिवडेकरने तिला आधार कार्ड आणि पासपोर्टसाठी लागणारी इतर कागदपत्रे मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पोलिसांनी ७ जानेवारी रोजी बांदिवडेकरलाही बेड्या ठोकल्या आहेत.

प्रकरणात आणखी कोण?

या दोघांवरही भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३६(२), ३३६(३), ३४०(२), ३३७, ३३९, ३१९ तसेच फॉरेनर्स ॲक्ट १९४६, पासपोर्ट ॲक्ट १९६७ आणि पासपोर्ट (एन्ट्री इन इंडिया) रुल्स १९५० च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा तपास पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'कुशावती' जिल्ह्याचा उदय! जिल्हा मुख्यालयाचा मान मिळाल्याने केपेवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

विदेशी माणसांप्रमाणेच विदेशी झाडेही आक्रमक! आपली जैवविविधता वाचवण्यासाठी 'देशी' वृक्षांची गरज

VIDEO: अर्शदीप सिंगच्या रन-अपची विराटनं उडवली खिल्ली! रोहितलाही हसू आवरले नाही; सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! गौरव बिद्रेचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला, विलंब होतो म्हणून जामीन मिळणार नाही

Goa Politics: खरी कुजबुज; भाजप खासदार काँग्रेस नेते?

SCROLL FOR NEXT