Goa Fraud Case Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud Case: बनावट 'आयपीओ'चे आमिष; ज्येष्ठाची 4 कोटींची फसवणूक, कोल्हापूर येथून संशयिताला अटक

Fraud Case: व्हॉट्सअ‍ॅप आणि यूट्यूब चॅनेलचा वापर करून बनावट गुंतवणूक कंपनी दाखवत खोट्या ‘आयपीओ’ मध्ये गुंतवणुकीचे प्रलोभन देत गोव्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी : व्हॉट्सअ‍ॅप आणि यूट्यूब चॅनेलचा वापर करून बनावट गुंतवणूक कंपनी दाखवत खोट्या ‘आयपीओ’ मध्ये गुंतवणुकीचे प्रलोभन देत गोव्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची ४.७४ कोटींची फसवणूक करणाऱ्या सूरज सावट (कोल्हापूर) याला सायबर क्राईम पोलिसांनी कोल्हापूरहून अटक केली. मोठ्या परताव्याचे आश्वासन देत संशयिताने तक्रारदाराला खोटे शेअर अलॉटमेंट दाखवून विश्वास संपादन केला होता.

या प्रकरणात तीन संशयितांपैकी सावटसह दोन जणांना अटक करण्यात आली असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. सायबर तपासात या व्यवहारांचा १३.१० कोटींच्या आठ सायबर गुन्ह्यांशी संबंध असल्याचे समोर आले.

संशयिताने ‘लेयर १’ म्हणून साथीदारांच्या खात्यांत लाखो रुपये स्वीकारून पुढे विविध राज्यांतील खात्यांत वळवले होते. सावटला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सायबर क्राइम पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, २४ सप्टेंबर २०२५ रोजी ‘बीएनएस कायदा २०२३ मधील कलम ३१८(४), ३१९(२) सह ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायदा कलम ६६-डी अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. २५ ऑगस्ट २०२५ पूर्वी संशयिताने आपला व्हॉट्सॲप आणि ‘यूट्यूब चॅनेल’ चा वापर करून आपली एक बनावट गुंतवणूक कंपनी असल्याचे सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT