Arrest Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: बनावट हॉटेल्‍स वेबसाईट्स रॅकेटचा पर्दाफाश! अनेक ग्राहकांची फसवणूक; मध्यप्रदेशच्या तरुणाला अटक

Fake hotel websites scam: गोवा, पुरी-ओडिशा आणि शिलाँग-मेघालय येथील हॉटेल्सच्या बनावट वेबसाईट्सच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.

Sameer Panditrao

Fake hotel websites scam goa

पणजी: बनावट हॉटेल्‍स वेबसाईट्स रॅकेटचा पर्दाफाश करण्‍यास पोलिसांना यश आले आहे. गोवा, पुरी-ओडिशा आणि शिलाँग-मेघालय येथील हॉटेल्सच्या बनावट वेबसाईट्सच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.

सासष्टीतील एका बीच रिसॉर्टच्या सरव्यवस्थापकाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती की, अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या रिसॉर्टची बनावट वेबसाईट तयार करून, त्याच ब्रँड नावाचा वापर करून ग्राहकांची फसवणूक केली. ग्राहकांना पैसे बनावट बँक खात्यांत ट्रान्सफर करण्यास प्रवृत्त करण्यात आले.

या प्रकरणी ललित खरे (२५, मध्यप्रदेश) याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या पथकात निरीक्षक प्रशाल देसाई, शिपाई एस. मकानदार आणि प्रकाश उत्तकरी यांचा समावेश होता. चौकशीत ललित खरेने आणखी सात बनावट हॉटेल वेबसाईट्स तयार केल्याची कबुली दिली. त्यात गोव्यातील ४, ओडिशातील २ आणि मेघालयातील एका हॉटेल्सच्या बनावट वेबसाईट्सचा समावेश आहे.

पुढील तपासात फिरोज अहमद (रा. गुना, मध्यप्रदेश) याने बनावट हॉटेल वेबसाईट तयार करण्यासाठी ललित खरेला पैसे दिले असल्याचे निष्पन्न झाले. त्याला भारतीय न्यायदंड संहितेअंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. याच्या चौकशीतून तपास राजस्थान येथे पोहोचला आहे.

हॉटेलच्या नावाने आणि छायाचित्रासह बनावट वेबसाईट तयार केली जाते. ही वेबसाईट गुगल लिस्टिंगला लिंक केली जाते. ग्राहक जेव्हा गुगलवर हॉटेल शोधतात, तेव्हा त्यांना बनावट वेबसाईटवर पाठवले जाते. त्या वेबसाईटवर व्हॉट्‌स-ॲप क्रमांक दिलेला असतो, जिथे ग्राहकाला खात्री पटवून बँक खात्यांत पैसे ट्रान्सफर करण्यास प्रवृत्त केले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT