Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud: प्रदूषण नियंत्रण मंडळाला लाखोंचा चुना! 'तोतया' अधिकाऱ्याकडून फसवणुकीचे सत्र सुरूच; पोलिस खाते अपयशी

Goa Pollution Control Board Fraud: गेल्या चार-पाच महिन्यांत या व्यक्तीने लाखोंचा अपहार केला असावा, असा मंडळाला संशय आहे. कोणताही परवाना आपण मिळवून देतो, असे सांगून ही व्यक्ती मोबाईलवर संपर्क साधते.

Sameer Panditrao

पणजी: गेले काही महिने एक व्यक्ती आपण गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी आहे, असे भासवून उद्योजक आणि मंडळाला लाखो रुपयांना चुना लावत असल्याचे उघड झाले आहे. मंडळाने सुरू केलेल्या तपासणी मोहिमेत उद्योजकांकडे असलेले परवाने बनावट असल्याचे आढळल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.

मंडळाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पोलिसांत तक्रार केली खरी; परंतु त्या व्यक्तीपर्यंत न पोचल्याने त्याने फसवणुकीचा प्रकार सुरूच ठेवला आहे. आता चौथे नाव आणि चौथा मोबाईल क्रमांक वापरून त्याने फसवणूक सुरू केल्याच्‍या तक्रारी मंडळाकडे उद्योजकांकडून येऊ लागल्या आहेत.

गेल्या चार-पाच महिन्यांत या व्यक्तीने लाखोंचा अपहार केला असावा, असा मंडळाला संशय आहे. कोणताही परवाना आपण मिळवून देतो, असे सांगून ही व्यक्ती मोबाईलवर संपर्क साधते.

पैसे दिल्यानंतर परवाना देते. प्रत्यक्षात तो मंडळाचा अधिकृत परवानाच नसतो. अशा व्यक्तीने उद्योजकांशी संपर्क साधण्यासाठी वापरलेल्या मोबाईल क्रमांकासह मंडळाने २३ ऑक्टोबर २०२४ रोजी साळगाव पोलिसांत प्रथम तक्रार केली होती. मात्र, पोलिस अद्याप त्या व्यक्तीपर्यंत पोचलेले नाहीत.

मुरगाव येथील मे. डॅड्‍ज यार्डचे ॲन्थनी रॉड्रिग्स यांची फसवणूक झाल्याचे प्रथम उघडकीस आले. त्यांनी मंडळाच्या परवान्यासाठी २४ हजार ९०० रुपये यूपीआय पेमेंट पद्धतीने ‘सुदेश गावस’ म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीला अदा केले होते.

तीच व्यक्ती नंतर ‘सूरज पेंडसे’ नावाने वावरत असल्याचेही अन्य काही उद्योजकांनी आपली फसवणूक झाल्याचे मंडळाकडे उघड केल्यावर मंडळाच्या लक्षात आले होते. साळगाव पोलिसांनी काणकोण पोलिसांकडे पहिली तक्रार वर्ग केली होती. त्यानंतरची तक्रार वेर्णा येथे वर्ग केली.

हे क्रमांक लक्षात ठेवा!

मंडळाने पोलिसांत केलेल्या तक्रारीत ७०२८७६९९०६, ७४९८०८९१७४, ९५५०००८१८६ या मोबाईल क्रमांकावरून उद्योजकांशी पैसे मागण्यासाठी संपर्क केला गेला आहे, असे नमूद केले आहे.

Goa Job Scam

मदत क्रमांक जारी

उद्योजकांकडून परवान्यासाठी मंडळ पैसे मागत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्यानंतर मंडळाने ऑनलाईन अर्ज भरणे, पैसे अदा करणे यात मदत करण्यासाठी ९३५६७०९४६१ हा मदत क्रमांक जारी केला आहे. मंडळाने आपल्या कामासाठी कोणताही एजंट नेमला नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

...अन्यथा सचिवांकडे तक्रार

मंडळाने आतापर्यंत यासंदर्भात पोलिसांना अनेक पत्रे लिहिली आहेत. मात्र, तपासकामात प्रगती दिसून न आल्याने आता मंडळाने थेट गृह सचिवांना आणि पोलिस महासंचालकांना पत्र लिहिण्याचे मंडळाने ठरविले आहे.

नाव बदलणारा ‘लखोबा लोखंडे’

मंडळाने ७ नोव्हेंबरला उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून संशयिताचे तिसरे नाव ‘सुदेश भोसले’ असे असल्याचे नमूद केले आहे. काणकोण येथील ‘बंक ॲण्ड ब्रू’चे ऑपरेटर दीप कानाकिया यांच्याशी संपर्क साधून त्याने पैशाची मागणी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

Goa: सभागृहावर पडले झाड, 2 वाहनांचे नुकसान; पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड

Ganesh Chitrashala: 80 वर्षे जुनी चित्रशाळा, आजही करते गणरायाची सेवा; नातू-पणतूनी ठेवली परंपरा सुरु

Goa Live News: 29 जुलैपर्यंत गोव्यात पावसाचा यलो अलर्ट

Goa Film Festival: गोवा चित्रपट महोत्सव कोणासाठी? की फक्त औपचारिक सोहळ्यांचे आयोजन..

SCROLL FOR NEXT