Fake FDA Officer Calangute Canva
गोवा

Goa Crime: कळंगुटमध्ये तोतया FDA अधिकाऱ्याचा उच्छाद, अन्न व्यवसायिकांना देतोय धमकी; मंत्री राणेंनी दिली माहिती

Fake FDA officer in Calangute: सोयरू नाईक तुयेकर ऊर्फ सर्वेश नाईक तुयेकर असे नाव असलेला व्यक्ती स्वतःला अन्न व औषध प्रशासन (एफडीए) खात्याचा अधिकारी म्हणून सांगत कळंगुट परिसरात फिरत आहे.

Sameer Panditrao

Fake FDA officer in Calangute

पणजी: राज्यात आतापर्यंत ‘कॅश फॉर जॉब’ किंवा ऑनलाईन पद्धतीने फसवणुकीचे अनेक प्रकार घडले असून त्यांची चौकशीही सुरू आहे. मात्र, आता चक्क अन्न व औषध प्रशासनाचा (एफडीए) अधिकारी असल्याचे सांगून एक तोतया कळंगुट परिसरातील अन्न व्यावसायिकांना धमकावत आहे. विशेष म्हणजे, आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे यांनीच ‘एक्स’वर याची माहिती दिली असून त्या व्यक्तीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

सविस्तर माहिती अशी की, सोयरू नाईक तुयेकर ऊर्फ सर्वेश नाईक तुयेकर असे नाव असलेला व्यक्ती स्वतःला अन्न व औषध प्रशासन (एफडीए) खात्याचा अधिकारी म्हणून सांगत कळंगुट परिसरात फिरत आहे. तो अस्खलित कोकणी बोलून अन्न व्यवसाय चालविणाऱ्या लोकांकडे पैसे मागत आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.

मंत्र्यांनी म्हटले आहे, की ती व्यक्ती दूरध्वनीद्वारे संबंधित लोकांना धमकावते आणि त्यांच्याकडून रोख रक्कम मागते. जर तुम्हाला या व्यक्तीविषयी काही माहिती असेल किंवा तो तुमच्या संपर्कात आला असेल, तर कृपया तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कळवा, असे आवाहनही मंत्री राणे यांनी केले आहे.

दोन मोबाईल क्रमांकांचा वापर

या व्यक्तीने ८७४७८५०८८५ आणि ९३५६२७८८३६ या दोन क्रमांकांवरून फोन केले आहेत. मात्र, ‘एफडीए’चा या व्यक्तीशी काडीमात्र संबंध नाही. अशा बनावट व्यक्तींच्या जाळ्यात न अडकता सावध राहावे. या प्रकाराबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून एफडीए संचालकांना संबंधित व्यक्तीविरोधात एफआयआर नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पर्यटकांना खोल्या, घरे भाड्याने देत असताना कागदपत्र तपासा'! द. गोवा जिल्‍हाधिकाऱ्यांच्या सूचना; चोरीच्‍या घटनांमुळे प्रशासन सावध

Akshay Patra Yojana: ..आणखी 3 हजार विद्यार्थ्यांना ‘अक्षयपात्र’! माध्यान्ह आहाराचा मुद्दा; वाढत्‍या मागणीनंतर शिक्षण खात्‍याचा निर्णय

Curti Khandepar Panchayat: कुर्टी-खांडेपार नूतन पंचायतघराला 'रवीं'चे नाव! ग्रामसभेत ठराव एकमताने संमत

Dabolim Airport: ‘दाबोळी’ बंद करण्याचे गुदिन्होंचे प्रयत्न! विरियातोंचा आरोप; वास्कोतील उड्डाणपूल बनला कळीचा मुद्दा

चंदेरी दुनियेत मंत्री तवडकरांची एन्ट्री! 'उलगुलान' चित्रपटात साकारली 'मुखिया'ची भूमिका; फोटोवरून चर्चा

SCROLL FOR NEXT