fake call centre busted in Anjuna Goa ai generated images
गोवा

Fake Call Centre Bust: हणजूण येथे बनावट कॉल सेंटरवर छापेमारी, क्राईम ब्रँचकडून 15 जणांना अटक; इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

Anjuna Fake Call Centre Bust: हणजूण येथे बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या एका बोगस कॉल सेंटरचा गोवा पोलिसांच्या क्राईम ब्रँचने पर्दाफाश केला.

Manish Jadhav

पणजी: हणजूण येथे बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या एका बोगस कॉल सेंटरचा गोवा पोलिसांच्या क्राईम ब्रँचने पर्दाफाश केला. एका गुप्त आणि विश्वासार्ह माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी धडक कारवाई करत तब्बल 15 जणांना रंगेहाथ पकडले. गोव्यासारख्या पर्यटनस्थळाचा वापर करुन सायबर गुन्हेगारी आणि फसवणुकीचे रॅकेट चालवणाऱ्या टोळ्यांविरुद्ध पोलिसांनी उचललेले हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हणजूण येथील एका ठिकाणाहून हे बनावट कॉल सेंटर चालवले जात होते, जिथून तांत्रिक फसवणूक किंवा इतर बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केले जात असल्याचा संशय होता. क्राईम ब्रँचच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वेश कर्पे यांच्या थेट देखरेखीखाली एका विशेष पथकाने या सेंटरवर छापेमारी केली. या छापेमारीत पोलिसांनी आरोपींना जागेवरच पकडले. या कारवाई दरम्यान गुन्ह्यासाठी वापरले जाणारे अनेक लॅपटॉप, मोबाईल फोन, चार्जर्स आणि इतर महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक उपकरणे पोलिसांनी जप्त केली.

प्राथमिक तपासानुसार, हे कॉल सेंटर देश-विदेशातील नागरिकांना तांत्रिक साहाय्य किंवा इतर आमिषे दाखवून लुटण्यासाठी वापरले जात असण्याची दाट शक्यता आहे. अटक करण्यात आलेल्या 15 आरोपींची सध्या कसून चौकशी केली जात असून, ते मूळचे कुठले आहेत आणि या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तांत्रिक तपासणी सुरु असून, त्यातून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. गोव्यात (Goa) अशा प्रकारच्या बेकायदेशीर कॉल सेंटर्सचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी क्राईम ब्रँचने आपली मोहीम तीव्र केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास वेगाने सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT