Fake Bomb Threat Dainik Gomantak
गोवा

'ती गोव्यात बॉम्ब ठेवणार आहे'! मैत्रिणीला फिरायला जाण्यापासून रोखण्यासाठी तरुणाचे भलतेच धाडस; रेल्वे पोलिसांकडून गुन्हा नोंद

Fake Bomb Threat Goa: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पा चौरे ही गोव्यात ३ किलो वजनाचा बॉम्ब ठेवण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती देणारा कॉल मुख्यमंत्री हेल्पलाईनवर आला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: आपली मैत्रीण गोव्यात फिरण्यासाठी जात असल्याने तीळपापड झालेल्या तिच्याच मित्राने गोव्यात बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती देण्याचे भलतेच धाडस प्रदीप कुमार याच्या अंगलट आले. त्याच्या विरोधात कोकण रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. मैत्रिणीला गोव्यात फिरायला जाण्यापासून रोखण्यासाठी संशयिताने हा बनाव रचल्याचे तपासात उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पा चौरे ही गोव्यात ३ किलो वजनाचा बॉम्ब ठेवण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती देणारा कॉल मुख्यमंत्री हेल्पलाईनवर आला होता. त्याबाबत २९ जानेवारी रोजी दुपारी १४.२५ वाजता पणजी नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली.

या घटनेचे गांभीर्य ओळखून कोकण रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा दल, दहशतवादविरोधी पथक, बॉम्बशोधक पथकाने तातडीने मडगाव आणि थिवी रेल्वे स्थानकांवर संयुक्त शोध मोहीम राबवली.

कॉल्स रेकॉर्डनुसार मिळालेल्या मोबाईल क्रमांकाची माहिती घेतली असता, हा क्रमांक मूळ भोपाळ (मध्यप्रदेश) येथील पण सध्या नागपूर (महाराष्ट्र) येथील प्रदीपकुमार याचा असल्याचे आढळले. पोलिसांनी तपासकाम सुरू केले असता, पुष्पा ही त्याची मैत्रीण असून तिला गोव्यात पर्यटनासाठी जायचे होते. पण प्रदीपला तिला गोव्याला जाऊ द्यायचे नव्हते, असे तपासात उघड झाले.

कणकवलीत रेल्वेमध्ये तपासणी

संशयित प्रदीपने रेल्वेतून गोव्यात येणाऱ्या पुष्पाची माहिती दिल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलासह पोलिसांनी प्रवास करणाऱ्या महिलेला आणि तिच्यासोबतच्या सात महिलांना कणकवली स्थानकावर उतरवून त्यांच्या साहित्याची तपासणी केली; परंतु त्यांच्याकडे कोणतीही संदिग्ध गोष्ट आढळली नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT