Goa Covid Care Centre  Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: राज्यात 300 खाटांच्या कोविड सेंटरची सोय

मुख्यमंत्री: मडगावात दोनशे, तर म्हापशात शंभर खाटा

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांसाठी म्हापसा येथे 100 तर मडगाव येथे 200 खाटांच्या स्वतंत्र सेंटरची सोय करण्यात आली आहे. कोरोनाच्या सध्याच्या तिसऱ्या लाटेमध्ये लसीकरण न घेतलेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण मोठे असल्याने नागरिकांनी लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. कोरोना व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते, यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे, मुख्य सचिव परीमल रॉय, आरोग्य संचालक आयरा अल्मेदा, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे (GMC) अधीक्षक डॉ. शिवानंद बांदेकर उपस्थित होते.(Facility of 300 bed Covid center in Goa state)

राज्यात बाधितांचे (Covid Case) प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मात्र, अधिकचा उपचारासाठी रुग्णालयात भरती होणाऱ्या रूग्णांमध्ये लसीकरण न घेतलेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. याशिवाय सध्याच्या लाटेत लसीकरण न घेतलेल्या लोकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे लसीकरण प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.

लस (Covid Vaccination) घेण्याचे आवाहन : लसीकरणासाठी पात्र असलेल्या पैकी 98 टक्के लोकांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र, अद्यापही दोन टक्के लोकांनी लोकांचे लसीकरण झालेले नाही. याशिवाय बूस्टर डोस घ्यावा लागणार आहे. त्यांनी तो तातडीने घ्यावा रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य प्रशासनाने विविध प्रकारचे प्रयत्न सुरू केले असून तातडीचे उपाय म्हणून अनेक उपाय योजना केल्याची माहिती सावंत यांनी दिली.

नव्या 2522 कोरोना रुग्णांची नोंद

आज कोरोना संक्रमण दर 45.78 टक्क्यांवर गेला आहे. याशिवाय 44 जणांना अधिकच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 21 हजार 997 झाली आहे. गेल्या चोवीस तासात नवे 2522 बाधित रुग्ण सापडले आहेत. 24 तासांत कोरोनामूळे 6 जणांचा मृत्यू झाला. गेल्या चोवीस तासांत 44 जणांना अधिकच्या उपचारासाठी रुग्णालयात भरती केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT