Dainik Gomantak
गोवा

फेसबुकद्वारे मैत्री आणि लग्नाचे आमिष, गुंगीचे औषध देऊन बलात्कार; फरार आरोपीला गोव्यातून अटक

हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवत आरोपीने तरूणीला कोल्ड्रिंक मधून गुंगीचे औषध पाजले

Pramod Yadav

फेसबुकद्वारे मैत्री करत लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला गोव्यातून अटक करण्यात आली आहे. हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवत आरोपीने तरूणीला कोल्ड्रिंक मधून गुंगीचे औषध पाजले, त्यानंतर बलात्कार केला. असा आरोप तरूणीने केला आहे. आशियाना, लखनऊ येथे जुलै 2023 मध्ये ही घटना घडली.

मुकेश गुप्ता (रा. बलिया ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

लखनऊच्या आशियाना पोलिसांनी एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, बलिया येथील रहिवासी मुकेश गुप्ता याला गोव्यातील मडगाव येथून अटक करण्यात आली आहे. मुकेश विरोधात तरुणीने जुलै 2023 मध्ये दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, फेसबुकवर चॅटिंग करत असताना मुकेशने तिला लग्नाचे आमिष दिले. त्यानंतर दोघेही भेटण्यासाठी लखनौला आले. मुकेशने तिला हॉटेलमध्ये नेऊन कोल्ड्रिंक मधून गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला.

पीडितेने विरोध केला असता आरोपीने तिला लग्नाचे आमिष दिले. लैंगिक शोषणाची शिकार झालेली पीडित तरूणी बलिया येथील मुकेशच्या घरी पोहोचली आणि त्याच्यावर लग्नासाठी दबाव निर्माण करू लागली.

पण, तिथे आरोपीच्या भावाने तरूणीला मारहाण करून तिला माघारी पाठवले. त्यानंतर तरुणीने आशियाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, फरार आरोपीला मडगाव, गोवा येथून पकडण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT