Goa Forward President Vijay Sardesai Dainik Gomantak
गोवा

युतीबद्दलची भूमिका चतुर्थीपूर्वी स्पष्ट करा, विजयचेही काँग्रेसला अल्टीमेटम

चतुर्थीच्या काळात लोकांच्या गाठीभेटी घेणे शक्य असते त्यामुळे काँग्रेसने हा निर्णय घ्यावा

दैनिक गोमन्तक

मडगाव: काँग्रेस (Congress) पक्षाला गोव्यात (Goa) इतर समविचारी पक्षाबरोबर युती करायची आहे की नाही हे त्यांनी चतुर्थीपर्यंत (Ganesh Chaturthi) स्पष्ट करावे असा निर्वाणीचा इशारा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Goa Forward President Vijay Sardesai)यांनी आज दिला.

आम्हालाही काँग्रेस कडून या बाबतीत स्पष्टता पाहिजे. चतुर्थीच्या काळात लोकांच्या गाठीभेटी घेणे शक्य असते त्यामुळेच आम्हाला काँग्रेसने हा निर्णय चतुर्थीपूर्वी घ्यायला हवा आहे. चतुर्थी नंतर आम्ही आमच्या प्रचाराला लागू असे त्यांनी मडगावात एका कार्यक्रमाच्या वेळी बोलताना सांगितले.

जर काँग्रेसला युती नको असेल तर त्यांनी तेही स्पष्ट करावे , जेणेकरून युती कोणाला नको हे गोव्याच्या जनतेलाही समजेल असे ते म्हणाले. मिकी पाशेको यांनी युती होऊ नये अशी भूमिका मांडली आहे असे त्यांना सांगितले असता, हा निर्णय घेणारा मिकी कोण ? काँग्रेसमध्ये ते कोणत्या पदावर आहेत? असा सवाल सरदेसाई यांनी केला.

दरम्यान गोव्यात खून, बलात्कार व अन्य गुन्ह्यांमध्ये वाढ होत चाललेली असून पोलिसांनी कुठल्याही प्रकरणाचा छडा लावण्यापूर्वी गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. राज्यात विरोधी पक्ष एकत्र नसल्यामुळे सत्ताधारी पक्षाने गोवा विकायला काढलेला आहे, असा आरोप विजय सरेदसाई यांनी केला. तर, सत्ताधारी पक्षाचा गोवा व गोमंतकीय विरोधी कृत्यांचा गोवा फॉरवर्ड पक्ष सतत पर्दाफास करीत राहणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT