Chandrakant Shetye Dainik Gomantak
गोवा

नानोडात 12 लाख खर्चून संरक्षक भिंतीच्या कामाची पायाभरणी

आमदार चंद्रकांत शेटये यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

साळ: डिचोली मतदारसंघातील नानोडा येथे बारा लाख रुपये खर्चून तीस मीटर लांब व चार मीटर उंच अशा संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे नुकतेच डिचोलीचे आमदार चंद्रकांत शेटये यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, माजी सरपंच शाम हरमलकर, जलसंपदा खात्याचे साहाय्यक अभियंता नरेश पोकळे, संतोष कलगुंटकर, प्रसाद गाड, अरुण कालेकर, मनोज कारापूरकर, ओंकार किनळेकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शेटये म्हणाले, की आता डिचोली मतदार संघाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे. रस्ता, पाणी आणि वीज या मूलभूत गरजा लोकापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. अनेक वर्षापासून या भागातील लोकांची मागणी होती की या ठिकाणी संरक्षक भिंत बांधली जावी जेणेकरून पावसाचे पाणी नजीकच्या घरापर्यंत येऊ शकणार नाही, संरक्षक भिंतीमुळे ओहोळाजवळच्या घरांना आता संरक्षण मिळणार आहे. खूप वर्षापासूनची मागणी आता पूर्ण होत असल्याने गावातील लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025 चा दिमाखदार समारोप! रजनीकांत, रणवीरच्या उपस्थितीने लावले चार चांद, ‘स्किन ऑफ युथ’ला गोल्डन पिकॉक तर संतोष दवखर यांना 'गोंधळ'साठी 'रौप्य मयूर'

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

SCROLL FOR NEXT