Jeet Arolkar
Jeet ArolkarDainik Gomantak

'पाण्यासाठी जीवनदायिनीचे ठरेल महत्त्वपूर्ण योगदान'

जीत आरोलकर: संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात
Published on

मोरजी: मांद्रे मतदारसंघात पाण्याचा प्रश्न बिकट बनत चालला आहे. जीवनदायिनीसारख्या संस्थांनी सहकार्य केल्यास हा प्रश्न सुटू शकतो. गावागावांतील नैसर्गिक स्रोतांचा वापर करून हा प्रश्न निश्चित सोडवू. भविष्यात पाण्याचा प्रश्न आणखीन जटील होणार नाही, याची काळजी घेऊ. तेरेखोल किल्ल्यावर शहिद झालेल्या शेषनाथ वाडेकर आणि हिरवे गुरुजी यांच्या स्मारक उभारणीच्या कामास गती दिली जाईल, असे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.

जीवनदायिनी, पेडणे संस्थेचा सहावा वर्धापनदिन रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यात जलसंवर्धनाचा निर्धार करण्यात आला. यावेळी आमदार जीत आरोलकर, सतीश शेटगांवकर उपस्थित होते दयानंद मंद्रेकर यांनी सूत्रसंचालन तर संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नारायण सोपटे केरकर यानी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. राजू बोन्द्रे यांनी आभार मानले.

Jeet Arolkar
गोमंतक मराठा समाजाचा वर्धापनदिन 8 रोजी

विहिरींकडे दुर्लक्ष

जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर म्हणाले, जुन्या काळात गावागावात असलेल्या विहिरीच्या पाण्याचा उपयोग होत असे. आज या विहिरींकडे दुर्लक्ष होत आहे. या पाण्याचा योग्य वापर व्हायला हवा त्यासाठी जीवनदायिनीने पुढाकार घेतल्यास सहकार्य करू असे सांगितले. पंचायत सदस्य सतीश शेटगांवकर म्हणाले, विकास प्रक्रियेत जनता महत्त्वाचा घटक आहे. जनतेच्या सहभागाने प्रत्येक क्षेत्राचा कायापालट करणे शक्य आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com