Fc Goa Dainik Gomantak
गोवा

एफसी गोवा प्रशिक्षकांना चमत्काराची अपेक्षा

आयएसएल स्पर्धेत तीस गुणांचा टप्पा गाठण्याचा डेरिक यांना विश्वास

दैनिक गोमन्तक

पणजी: एफसी गोवाने आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत दोन वेळच्या माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीचा पाच गोलने धुव्वा उडविला, त्यानंतर आपल्याला चमत्काराची अपेक्षा असून संघ तीस गुणांचा टप्पा गाठू शकतो, असा विश्वास मुख्य प्रशिक्षक डेरिक परेरा यांनी व्यक्त केला.

स्पॅनिश आघाडीपटू होर्गे ओर्तिझ याच्या हॅटट्रिकच्या बळावर एफसी गोवाने बुधवारी रात्री वास्को येथील टिळक मैदानावर चेन्नईयीनला 5-0 फरकाने पराभूत केले. त्यानंतर डेरिक बोलत होते. एफसी गोवाचे (FC Goa) सध्या 16 लढतीतून 18 गुण झाले आहेत. बाकी चारही सामने जिंकले, तर त्यांना प्ले-ऑफ फेरीची संधी असेल.

‘‘होय, चमत्कार घडतात, देवावर श्रद्धा असल्यास काहीही शक्य असल्याचे मला वाटते. प्रत्येक सामन्यागणिक आमचे नियोजन असेल. पुढील सामना खूप महत्त्वाचा आहे, तो खडतरच असेल, पण आम्ही अपेक्षित निकालासाठी कामगिरी करण्याच्या उद्देशाने मैदानावर जाऊ. अखेरीस आम्ही कुठवर मजल मारू हे स्पष्ट होईल,’’ असे 59 वर्षीय डेरिक म्हणाले. एफसी गोवाचा पुढील सामना 15 फेब्रुवारी रोजी बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर एटीके मोहन बागानविरुद्ध होईल.

खेळाडूंच्या मेहनतीमुळे विजय

एफसी गोवा संघातील खेळाडूंनी अथक मेहनत घेतली, त्यामुळेच चेन्नईयीनविरुद्ध संस्मरणीय विजय नोंदविता आला, असे मतही डेरिक यांनी व्यक्त केले. पाच सामने विजयाविना राहिल्यानंतर त्यांनी बुधवारी रात्री विजयासह गवसणी घातली. एकंदरीत एफसी गोवाचा हा चौथा विजय ठरला. चेन्नईयीनविरुद्ध पूर्वार्धात चार गोलची आघाडी घेतल्यानंतर एफसी गोवाने प्रतिस्पर्ध्यांना डोके वर काढूच दिले नाही. हॅटट्रिकवीर ओर्तिझ दुखापतीमुळे दोन सामन्यांस मुकला होता, मात्र टिळक मैदानावर त्याने दणक्यात पुनरागमन केले.

अनपेक्षित निकाल

‘‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास, मला कठीण आव्हानाची अपेक्षा होती. मला वाटतं, आम्ही चांगला खेळ केला. सामन्यावर नियंत्रण योग्यप्रकारे राखले. गोल करण्याची वेळ निर्णायक ठरली, नंतर आम्ही वर्चस्व निसटू दिले नाही. माझ्या मते, या निकालासाठी खेळाडूंनी खूप मेहनत घेतली,’’ असे डेरिक यांनी नमूद केले. चेन्नईयीनला स्थिरावू द्यायचे नाही हे लक्ष्य बाळगूनच एफसी गोवाने खेळ केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अगोदरच्या लढतीत आघाडीफळीतील सदोष नेमबाजीमुळे एफसी गोवाचे नुकसान झाले, ही चूक आम्ही दुरुस्त केली. आता बाकी सामने खडतर असल्याने आम्हाला आघाडीफळीत भेदकता राखावी लागेल, असे डेरिक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT