CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: एक्झिट पोलचे अंदाज ठरले खोटे; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

CM Pramod Sawant: गोव्यातील अनेक नेत्यांनी केल्या भावना व्यक्त....

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant: चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर तीन राज्यांत भाजपचे वर्चस्व सिद्ध झाले.

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘हमी’चा (गॅरण्टी) प्रभाव दिसून आला.

तेथील मतदारांनी एक्झिट पोलचा कलही खोटा ठरविला, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

भाजपच्या मुख्यालयात रविवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर आणि माजी आमदार दामू नाईक उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान येथील जनतेने भाजपला अपेक्षेपेक्षाही मोठे यश मिळवून दिले. मी स्वतः चार राज्यांमध्ये प्रचारासाठी गेलो होतो. मध्यप्रदेशमध्ये जनतेने मोठे यश पदरी टाकले आहे. पंतप्रधान मोदी यांनीही याठिकाणी जोरदार प्रचार केला.

मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपला यश मिळाले. तेथे महिलांसाठी सुरू केलेल्या योजना प्रभावी ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.

राजस्थानात ‘रेड डायरी’ भोवली

राजस्थानमध्ये अशोक गेहलोत सरकारच्या ‘रेड डायरी’चा परिणाम लोकांवर निश्‍चित झाला. ढासळलेली कायदा-सुव्यवस्था, महिलांवरील वाढते अत्याचार हे विषय प्रचारात होते. लोकांनाच काँग्रेसचे सरकार बदलायचे होते.

छत्तीसगडमध्ये सरकारचे विविध घोटाळे, महादेव ॲपमधील सरकारचा सहभाग यांना लोक कंटाळले होते. तेलंगणामध्ये २०१८ पेक्षा यावेळी भाजपने चांगली कामगिरी केली आहे. पुढील काळात भाजप दक्षिणेत चांगली कामगिरी करेल, असा विश्‍वास सावंत यांनी व्यक्त केला.

मोदींवर विश्वास

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले की, या निकालामुळे मी भारावून गेलो आहे. या यशाचे साक्षीदार झाल्याने माझे मन अभिमानाने फुलले आहे. मोदी हे विश्वगुरू आहेत, जगात त्यांच्या नावाचे वलय निर्माण झाले आहे.

जनतेचा पंतप्रधानांवरील अतूट विश्वास या विजयामुळे अधोरेखित झाला आहे. लोकांचा त्यांच्यावरील विश्वास टिकून राहावा.

विकासाला मतदान

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, भाजप सरकारने विकासाबाबत भेदभाव केलेला नाही. ज्याठिकाणी भाजपचे सरकार नाही, तेथेही विकास पोहोचविला आहे. त्यामुळेच जनतेने त्यांच्यावर विश्‍वास ठेवला आहे.

एक्झिट पोलमध्ये चार राज्यांचे निकाल भाजपविरोधी असल्याचे वाटत होते; परंतु जनतेने भाजपच्या बाजूने कौल देत स्पष्ट बहुमत दिले आहे. हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हमी’मुळे शक्य झाले. आगामी काळासाठी भाजपचा विकास हाच अजेंडा अाहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

SCROLL FOR NEXT