Assembly Election 2024: ‘इंडिया’ आघाडीला झिडकारले; पणजीत भाजपचा जल्लोषात विजयोत्सव

Pramod Sawant: गोव्यात विजयोत्सव; 400 हून अधिक खासदार येणार निवडून
Assembly Election
Assembly ElectionDainik Gomantak

Assembly Election 2024: सर्वांच्या नजरा खिळून राहिलेल्या मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने घवघवीत यश संपादन केल्यानंतर रविवारी दुपारी पणजीत भाजपने जल्लोषात विजयोत्सव साजरा केला.

Assembly Election
Goa Tourism: गोव्यतील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ; दोना पावला

पणजीत पक्षाच्या मुख्यालयासमोरील रस्त्यावर फटाके फोडून आणि मिठाई वाटून नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी तीन राज्यांतील विजयाचा आनंद साजरा केला.

‘इंडिया’ आघाडीला जनतेने झिडकारले असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जनता भाजपसोबतच राहील आणि ४०० हून अधिक खासदार निवडून येतील, असा विश्‍वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काही कार्यकर्त्यांसमवेत भाजप कार्यालयात चार राज्यांचे निकाल दूरचित्रवाहिनीवरून पाहिले. भाजपच्या बाजूने जसजसा कल झुकत होता, तसतसा नेते-कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित होत होता.

काहीजणांनी मिठाई आणून प्रदेशाध्यक्ष तानावडे यांना भरविली. निकालाचा कौल भाजपच्या बाजूने लागला आणि भाजप सत्तेजवळ पोहोचल्याचे समजताच पक्ष कार्यालयातून आनंदोत्सव साजरा करण्याचा संदेश कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर पोहोचला.

तसतसे कार्यकर्ते भाजप कार्यालयाकडे गर्दी करू लागले. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

कार्यकर्त्यांनी पक्षाच्या मुख्यालयासमोरील रस्त्यावर फटाके फोडले आणि एकमेकांना शुभेच्छा देत विजयोत्सव साजरा केला. विशेष म्हणजे, गोव्यातील भाजपचे नेते निवडणुकीनिमित्त या चार राज्यांमध्ये प्रचारात सहभागी झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com