Dabolim Airport Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport : ‘दाबोळी’चे अस्‍तित्‍व अबाधित; मंत्री व्ही. के. सिंग यांचे स्पष्टीकरण

‘मोपा’च्‍या नामकरणाचा निर्णय केंद्र सरकार घेणार

दैनिक गोमन्तक

पणजी : उत्तर गोव्यातील मोपा विमानतळासाठी जीएमआर कंपनीशी 2010 मध्ये करार झाला होता. यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार ‘मोपा’ सुरू झाले तरी दाबोळी विमानतळ सुरूच राहील. तसेच मोपा विमानतळाला कुणाचे नाव द्यायचे, याबाबतचा निर्णय केंद्र सरकार घेईल, असे स्पष्टीकरण आज केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी दिले.

पणजी येथे आयोजित आशियाई पॅसिफिक हवाई वाहतूक नियंत्रण विभागाच्या परिषदेचे उद्‌घाटन केल्‍यानंतर मंत्री सिंग यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, केंद्रीय विमान प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीव कुमार, केंद्रीय विमान वाहतूक विभागाचे सचिव राजीव बन्सल उपस्थित होते. यावेळी सिंग म्हणाले, ‘दाबोळी’ 20 राष्ट्रीय-आतंरराष्ट्रीय शहरांशी जोडलेले आहे. यापुढील 20 नवीन शहरे जोडली जातील. ही अतिरिक्त वाहतूक दाबोळी विमानतळावरील मर्यादेमुळे वळविणे क्रमप्राप्त आहे.

दक्षिण गोव्‍यातील अनेकांना दिलासा

‘मोपा’मुळे ‘दाबोळी’ वरील विमान वाहतूक तिकडे वळविली जाते की काय, अशी भीती दक्षिण गोव्यातील व्यावसायिकांना होती. विरोधकांनीही ‘दाबोळी’ आता ‘घोस्ट विमानतळ’ होणार, अशी हवा केल्‍यामुळे याबाबतच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र, केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांच्या स्पष्टीकरणामुळे अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे.

मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

‘मोपा’ला गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर तसेच माजी संरक्षण मंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. मात्र, नामकरणाचा निर्णय केंद्र घेईल. तसेच ‘मोपा’चे काम अंतिम टप्प्यात आहे. याच्‍या उद्‌घाटनासाठी मुख्यमंत्री सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. याबाबतचा निर्णय पंतप्रधान कार्यालय लवकरच घेईल, असे सिंग यांनी सांगितले.

...तर विमान वाहतुकीचे दर कमी होतील

‘मोपा’चे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच ते कार्यान्वित होईल. याचा फायदा गोव्याच्या पर्यटन उद्योगाला नक्कीच होईल. सध्या विमान प्रवास वाहतुकीचे दर जास्त आहेत. जितकी विमान वाहतूक जास्त, तितका विमान वाहतुकीचा दर कमी, हा अनुभव आहे. त्यामुळे भविष्यात विमान वाहतुकीचे दर कमी होतील, असा विश्‍‍वास केंद्रीय मंत्री सिंग यांनी व्‍यक्त केला.

दोन ठिकाणी ड्रोन टॅक्सी

जगभरात ड्रोन तंत्रज्ञान झपाट्याने वाढत असून देशातही त्याचा वापर वाढणार आहे. याचाच भाग म्हणून ड्रोन टॅक्सी सेवा मुंबई आणि बंगळूर विमानतळावर लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी दिली. सध्या यावर आयआयटी बंगळूर आणि हैदराबाद काम करत आहे, असे ते म्हणाले.

संरक्षण दलाच्या गरजा आणि आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीचा ट्रेड पाहता ‘दाबोळी’वर प्रवासी विमान वाहतुकीला मर्यादा होत्या. म्हणूनच ‘मोपा’ला मंजुरी दिली. ओमान एअरलाईन्सने आपली विमाने ‘मोपा’वर उतरतील, असे जाहीर केले असले तरी, त्यांची विमान वाहतूक कमी असल्याने त्या निर्णयाचा ‘दाबोळी’वर फारसा परिणाम होणार नाही.

- व्ही. के. सिंग, केंद्रीय मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; ‘त्‍या’ मंत्री, आमदारांच्‍या गोटात खळबळ

Goa ZP Election Result 2025 Live Update: लाटंबार्से मतदारसंघ मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण, भाजप उमेदवाराला 497 मतांची आघाडी

Goa Leopard Accident: ..अचानक बिबट्या आला धावत, दुचाकीला दिली धडक, चालक कोसळला जमिनीवर Watch Video

Goa ZP Election: भाजप–मगो युती 35 पेक्षा अधिक जागा जिंकेल! दामू नाईकांना ठाम विश्‍‍वास; सरकारमुळे मतदान वाढल्याचा केला दावा

Bardez: बार्देशात नेत्यांसमोर वर्चस्वाचे आव्हान, सस्पेन्स वाढला; ‘सायलंट’ मतदानामुळे अंदाज बांधणे कठीण

SCROLL FOR NEXT