Sanguem Panchayat  Dainik Gomantak
गोवा

Sanguem Eco Sensitive Zone: इको सेन्सिटिव्ह विभागातून सांगेतील गाव वगळा; जिल्हा पंचायत बैठकीत ठराव

इको सेन्सिटिव्ह विभागाची बंधने आल्यास विकास अधिकच खुंटला जाण्याची शक्यता.

Pramod Yadav

पश्चिम घाट (Western Ghat) क्षेत्र सांभाळण्यासाठी इको सेन्सिटिव्ह बफर झोन (Eco Sensitive Buffer Zone) क्षेत्र करण्याचा विचार सुरू आहे. दरम्यान, इको सेन्सिटिव्ह क्षेत्राखाली येणारी सांगे (Sanguem) तालुक्यातील घरे वगळा असा ठराव आज दक्षिण गोवा (South Goa) जिल्हा पंचायत बैठकीत घेण्यात आला.

रिवण मतदारसंघाचे सदस्य सुरेश केपेकर यांनी हा ठराव मांडला. सांगे तालुका आधीच मागास तालुका असून इको सेन्सिटिव्ह विभागाची बंधने आल्यास त्याचा विकास अधिकच खुंटला जाणार असा दावा त्यांनी केला आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत बोरी पुलाला मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. दक्षिण गोव्यात जिल्हा पंचायत भवन व्हावे यासाठी मुखमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांच्याकडे तसेच कित्तेक गावात अजुन पुरेशी बससेवा उपलब्ध नाही. त्यामुळे त्या गावात कदंबा बस सूरू करण्यासाठी कदंब महांडलाच्या अध्यक्षाकडे पाठपुरावा करण्याचा ठराव आज मंजूर करण्यात आला.

दक्षिण गोवा जिल्हा पंचायत समितीमार्फत 284 विकासकामे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष सुवर्णा तेंडूलकर यांनी दिली. 15 व्या वित्त आयोगाकडून पण जिल्हा पंचायतीला 2.80 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यातून ही कामे हातात घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT