Alcohol Smuggling : माजाळी तपासणी नाक्यावर कर्नाटक अबकारी खात्याचे कर्मचारी आर.एन.नाईक माहिती देताना. Dainik Gomantak
गोवा

गोव्यातून कर्नाटकात मद्याची वाहतूक करणारी वाहने ताब्यात

राज्याची पोळे तपासणी नाका ओलांडून ही वाहने कर्नाटकात प्रवेश करत असताना माजाळी तपासणी नाक्यावर अबकारी अधिकाऱ्यांनी ती जप्त केली.

दैनिक गोमन्तक

काणकोण (Canacona) : माजाळी तपासणी नाक्यावर जानेवारी पासून नोव्हेंबर या अकरा महिन्यांत वाहनासह 1 कोटी 30 लाख रूपयाचा अबकारी माल कर्नाटक (Karnatak) अबकारी खात्याने जप्त केला आहे.त्यामध्ये अवैधरित्या गोव्यातून (Goa) कर्नाटकात मद्याची वाहतूक करणारी वाहने व मद्याचा समावेश (Alcohol Smuggling) आहे. त्यांत 80 लाख रुपये किंमतीची वाहने व 50 लाख रूपये किंमतीच्या म समावेश आहे.

माजाळी तपासणी नाक्यावर अबकारी खात्याचे कर्मचारी वाहनाची तपासणी करताना.

त्यामध्ये अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या बारा टायरांची चार वाहने,दहा टायरांचे एक वाहन व एक इन्सुलेटर या काळात जप्त करण्यात आला आहे. त्या वाहनातून 6080 लिटर परदेशी बनावटीचे मद्य व 4375 लिटर स्पिरिट जप्त केले असल्याचे अबकारी खत्याचे कर्मचारी आर.एन.नाईक यांनी माहिती देताना सांगितले. राज्याची पोळे तपासणी नाका ओलांडून ही वाहने कर्नाटकात प्रवेश करत असताना माजाळी तपासणी नाक्यावर अबकारी अधिकाऱ्यांनी ती जप्त केली.

या तपासणी नाक्यावर अवैध रित्या मद्याची वाहतूक करण्यात वापरलेली सुमारे 27 वाहने आहेत.

काहीवेळा खबऱ्या कडून माहिती मिळते मात्र चोवीस तास अबकारी पोलिस गोव्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करतात असे तपासणी नाक्यावरील अबकारी खात्याचे कर्मचारी आर.एन.नाईक यांनी सांगितले.

प्राप्त माहितीनुसार पोळे तपासणी नाक्यावर अबकारी निरिक्षक व कर्मचारी चोवीस तास असतात.नाक्यावरील गेट चोवीस तास उघडीच असते.पूर्वी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते मात्र नादुरुस्त होऊन अनेक वर्षे लोटली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT