Goa Feni Dainik Gomantak
गोवा

Goa Feni: फेणीला चांगली बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने घेतला 'हा' निर्णय

उत्पादन शुल्क विभागाने या 'हेरिटेज ड्रिंक'कडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी एक निर्णय घेतलाय

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा राज्यात काजू उत्पादक मोठ्या प्रमाणावर असून गोव्यात काजूच्या फळापासून फेणी हे पेय तयार केले जाते. फेणी ही दारूसारखीच नशा येणारी आहे असा समाज पसरला होता. मात्र हा अपप्रचार दूर करण्यासाठी राज्याने फेणीला पेयाला 'हेरिटेज ड्रिंक' म्हणून जाहीर केलंय.

फेणी धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. गोव्याने काही राज्यांना त्यांच्या संबंधित कार्यक्षेत्रात फेणी विकण्याची परवानगी देण्यासाठी पत्र लिहिले होते. मात्र अद्याप त्यांच्याकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाहीय. .

या बाबत उत्पादन शुल्क अधीक्षक महेश कोरगावकर म्हणाले की, "फेणीला 'हेरिटेज ड्रिंक' म्हणून जाहीर केल्यानंतर फेणीची मागणी आणि विक्री तेजीत होईल असे वाटले होते. मात्र अनेक राज्ये फेणी विक्रीला परवानगी देण्यास तयार नसल्याने आमचे काम अवघड होत आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने या हेरिटेज ड्रिंककडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी एक निर्णय घेतला आहे."

गोव्याच्या उत्पादन शुल्क विभागाने दाबोळी आणि मोपा विमानतळावर फेणी तयार करण्यासाठी जी ऊर्धपातन प्रक्रिया केली जाते त्या भट्टीची प्रतिकृती बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांचे या फेणी उद्योगाकडे लक्ष वेधले जाऊन फेणीला चांगले दिवस येण्याची शक्यता वर्तवली जातेय.

मात्र यासोबतच गोवा सरकार फेणी उद्योगासाठी कितपत प्रयत्न करते यावर सर्व अवलंबून असल्याचे इथल्या स्थानिकांचे म्हणणे आहे. फेणीची एक वेगळी ओळख असून तिला कोणत्याही नवीन बाजारपेठेत चटकन प्रवेश करणे कठीण आहे. त्यामुळे फेणी विक्रीसाठी फक्त फेणी महोत्सवाचे आयोजन करणे एवढेच पुरेसे नाही.

अधीक्षक कोरगावकर म्हणाले की, अन्न आणि औषध प्रशासन विभाग (FDA) फेणी बाटलीबंद करताना अल्कोहोलयुक्त पेयाची मात्रा तपासते. त्यामुळे बाजारात चांगलेच उत्पादन जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Video: 36 वर्षांपूर्वी लाहोरमध्ये विनोद खन्नांनी केलेली 'ती' स्टेप; अक्षय खन्नाचा FA9LA डान्स वडिलांची 'Copy'?

Aropra Nightclub Fire: रोमिओ लेन प्रकरणात 'बेली डान्सर' अडकली! केलं कायद्याचं उल्लंघन; क्रिस्टीनाला 'काम' करण्याची परवानगी नव्हती?

China Fire Tragedy: चीनमध्ये निवासी इमारतीला भीषण आग, 13 जणांचा होरपळून मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती VIDEO

IND vs SA: 'जस्सी जैसा कोई नहीं!' बुमराहने 'शतक' ठोकून रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज! VIDEO

अग्रलेख: निष्काळजीपणा नव्हे, सदोष मनुष्यवध! हडफडे दुर्घटनेने हादरवलं; नियमभंगाच्या कुबड्यांवर तग धरलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT