Betel Nut Farms At Sanguem Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon: अति पावसामुळे सांगेत सुपारी उत्पादकांना फटका! अजूनही गळती सुरुच; शेतकऱ्यांत चिंता

गोमन्तक डिजिटल टीम

Sanguem Betel Nuts

सांगे: यंदा अति पावसामुळे तालुक्यात बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषत: सुपारी उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. पावसामुळे वेळीच औषध फवारणी करता न आल्यामुळे बुरशीमुळे मोठ्या प्रमाणात सुपारी गळून पडली आहे, त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादकांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

सांगे तालुक्यात भाटी, उगे, नेत्रावळी, रिवण आदी भागात सुपारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु यंदा सुमारे साठ टक्के सुपारी गळून पडल्याचे उत्पादक सांगतात.

सुपारी उत्पादकांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन वर्षे सातत्याने सुपारी उत्पादक नुकसान सोसत आहे. अति पावसामुळे बुरशी धरून मोठ्या प्रमाणात कोवळी सुपारी झडत आहे. त्यामुळे उत्पादकांना लाखोंचा फटका बसला आहे. सरकारने हवामान खात्याकडून मागील तीन वर्षांत तालुक्यात पडलेल्या पावसाची नोंद घेउन नुकसानीचा अंदाज घ्यावा व उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

यापूर्वी सांगेचे आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या नेतृत्वाखाली काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन माहिती दिली आहे. तसेच नुकसान भरपाई व सबसिडी देण्याबाबत मागणी केली आहे. मात्र सरकारने यावर अजून गांभिर्याने विचार केलेला नाही, त्यामुळे उत्पादक नाराजी व्यक्त करीत आहेत.

अजूनही गळती चालूच; शेतकऱ्यांत चिंता

आपण औषध फवारणी केली, परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे औषध फवारणी वाया गेली. बुरशी लागून कोवळी सुपारी मोठ्या प्रमाणात गळून पडली. अजूनही गळतीचे प्रमाण चालूच आहे. आतापर्यंत ५० ते ६० टक्के सुपारी गळून पडली आहे. हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने शेतकरी आधार निधी अंतर्गत उत्पादकांना आर्थिक साहाय्य करावे, अशी मागणी नेत्रावळी येथील प्रगतशील शेतकरी हर्षद प्रभुदेसाई यांनी केली.

सबसिडीही नाही

मुख्य म्हणजे सुपारी खाद्य प्रदार्थामध्ये मोडत असल्याने उत्पादकांना सरकारकडून कोणतीही सबसिडी मिळत नाही. त्यात सुपारीचा दर जास्त व सरकारचा हमी भाव कमी अशी स्थिती आहे. यापूर्वी देखील सुपारीची मोठ्या प्रमाणात गळती झाली, तेव्हाही उत्पादकांनी नुकसान भरपाई मागितली होती. परंतु सरकारने कधीच नुकसान भरपाई दिलेली नाही. यंदा तरी मिळेल, अशी आशा बागायतदार बाळगून आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ओल्ड गोवा येथे दुचाकीच्या अपघातात 17 वर्षीय तरुण ठार, डिचोलीत गॅरेजमधील दुचाकींना आग; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Mahalaya Pitru Paksha Shraddh 2024: श्राद्ध का करावे?

Ratnagiri Crime: स्वप्न, मृतदेह! खेड, रत्नागिरी प्रकरणात नवा ट्विस्ट; आर्याचा भोस्ते घाटात होता वावर

Goa Weather Update: गोव्यात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता, दोन दिवस 'यलो अलर्ट'

Goa Blitz Chess Tournament: ब्लिट्झ फिडे बुद्धिबळ स्पर्धेत नीतिश विजेता; अपराजित राहून सर्वाधिक साडेदहा गुणांची कमाई

SCROLL FOR NEXT