Illegal Sand Mining in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Sand Mining: प्रशासनाच्या छुप्या आशीर्वादानेच रेतीचे उत्खनन

दिगास-पंचवाडीतील प्रकार : सावर्डेतील एका उद्योजक राजकारण्याचा व्यवसायात सहभाग

सुशांत कुंकळयेकर

Goa Sand Mining: मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीररीत्या केल्या जाणाऱ्या रेती उपशावर चाप आणा, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले असले तरी फोंडा आणि कुडचडे या भागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कानावर हे निर्देश आलेले नाहीत की काय, असे आता या भागातील लोकांना वाटू लागले आहे.

कारण दिगास-पंचवाडी या भागात रेती उत्खनन खुलेआम चालू आहे. या गोष्टीकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असून पोलिसही हाताची घडी तोंडावर बोट या मन:स्थितीत वागत आहेत.

मायणा-कुडतरी पोलिस स्थानकाच्या कक्षेत येणाऱ्या गिरदोली येथे झुआरी नदीत सक्शन लावून रेतीचा उपसा केला जात असून नंतर ही रेती होडीतून फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या दिगाशेर आणि शिमेर या भागात आणून खाली केली जाते.

रात्रीच ही रेती ट्रकांत भरून कुडचडे पोलिस स्थानकाच्या हद्दीतून तिची वाहतूक केली जाते. रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत हा खेळ चालू असताे. पहाटे 5 वा.च्या ठोक्याला हे गोरखधंदे बंद केले जातात.

सावर्डे परिसरातील एक उद्योजक असलेला स्थानिक राजकारणी या अवैध धंद्यात असून त्यानेच सगळीकडे सेटिंग केल्याने या अवैध धंद्यांना प्रशासकीय समर्थन लाभल्याचे समजते. या अवैध धंद्यात बंदर कप्तान खात्याचेही दोन कर्मचारी गुंतले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

पंचवाडी येथून ही रेती भरून आणण्यासाठी दररोज किमान 60 ट्रक वापरले जातात. पूर्वी हे रेती उत्खनन सावर्डे आणि कुडचडे भागात मोठ्या प्रमाणावर चालू होते. मात्र, मागच्या वर्षी याच व्यवसायाच्या वैमनस्यातून कुडचडे परिसरात एक खून झाल्यावर कुडचडे पोलिस स्थानकाच्या हद्दीत चालू असलेले उत्खनन बंद करण्यात आले. या हद्दीला लागून असलेल्या भागात ते अजूनही चालू असून पोलिस आणखी एक खून होण्याची वाट पाहात आहेत का, असा सवाल लोक करत आहेत.

कुंपणच जेव्हा शेत खाते

वास्तविक या बेकायेशीररीत्या चालू असलेल्या रेती उत्खननावर निर्बंध आणण्याचे काम बंदर कप्तान खात्याचे असते. मात्र, येथे चालू असलेल्या या धंद्यात याच खात्याचे दोन कर्मचारी गुंतले असल्याने ज्या दिवशी छापा मारण्याचा फार्स केला जातो, नेमक्या त्याचवेळी हे काम बंद केले जाते.

त्यांच्या विरोधात कुणी आवाज उठविला तर हेच कर्मचारी जे लोक पूर्वी या धंद्यात होते; पण आता काम बंद ठेवले आहे त्यांच्या नदीच्या काठी असलेल्या होड्या जप्त करतात. या कारवाईसाठी लागणारे कामगारही ते दोघेच पुरवतात, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

सक्शनमागे 15 तर ट्रकमागे 5

हे अवैध धंदे बिनबोभाट चालू राहावेत यासाठी पोलिसांना सेट करण्यात आले असून एका सक्शनमागे दरमहा 15 हजार तर या रेतीची वाहतूक करणाऱ्या दर ट्रकमागे दरमहा 5 हजार, असा हप्ता दिला जातो. हा धंदा करण्यासाठी एकमेव अट पाळण्याची गरज आहे आणि ती म्हणजे हे सर्व काम रात्री 12 ते पहाटे 5 वा. या सहा तासांत पार पाडणे आवश्यक असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT