Goa Accident : सरकारच्या उदासीन धोरणांमुळे अपघातसत्र सुरू : सरदेसाई

माविन म्हणतात, ‘ब्लॅक स्पॉट’ हटविणार
Vijay Sardesai
Vijay SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Accident : चालक नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळेच अपघातांचे प्रमाण वाढल्याचे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठविली आहे. रस्त्यांवरील खड्डे, ओबडधोबड रस्ते हेच अपघातांचे प्रमुख कारण आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, तर सरकारच्या उदासीन धोरणांमुळे अपघातसत्र सुरू असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे.

Vijay Sardesai
South Goa: दक्षिण गोव्यातील पर्यटनाला मिळणार बूस्टर, पर्यटन मंत्री खंवटे म्हणाले मार्च महिन्यात...

आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत राज्यातील अपघातांबाबत लोकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले. तसेच बेशिस्त चालकांमुळेच अपघात होत असल्याचे सांगितले. यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत.

‘बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघात होतात, असे वक्तव्य करून सरकार जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहे. वाहतूक विभाग व पोलिस भ्रष्टाचारात गुंतल्यानेच चालकांवर कारवाई होत नाही. वाहतूक नियमांचे योग्य फलक नाहीत. खड्डे, ओबडधोबड रस्ते हेच अपघातांचे प्रमुख कारण आहे, असे आलेमाव म्हणाले.

Vijay Sardesai
Dabolim Airport: खराब हवामानाचा फटका; दाबोळीवर सकाळी उतरणारी आठ विमाने इतरत्र वळवली, अखेर

अपघातांची वाढती संख्या सरकारसाठी चिंतेचा विषय आहे. राज्यातील ‘ब्लॅक स्पॉट’ ओळखले जात असून संरेखन करून अनेक ब्लॅक स्पॉट काढले आहेत. सुरक्षा समितीच्या लवकरच होणाऱ्या बैठकीत आणखी ‘ब्लॅक स्पॉट’ काढण्‍याबाबत चर्चा होईल. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दंडाची रक्कम वाढवूनही लोक नियमांचे पालन करत नाहीत.

- माविन गुदिन्हो, वाहतूकमंत्री.

चालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात होतात, असे मुख्यमंत्री म्हणतात. हे म्हणजे आपल्यावरील जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्यासारखे झाले. वाहतूक विभागात कर्मचाऱ्यांची कमी संख्या असून नियमांची अंमलबजावणी होत नसल्यामुळेच अपघात वाढतात. मुख्यमंत्र्यांना खरेच जर अपघात कमी करायचे असतील, तर त्यांनी फातोर्डा येथील बंद पडलेले सिग्नल्स सुरू करावेत.

- विजय सरदेसाई, आमदार, गोवा फॉरवर्ड.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com