Subhash Velingkar Contoversial Remark Dainik Gomantak
गोवा

DNA चाचणीच्या मागणीनंतर सुभाष वेलिंगकरांचे 'झेवियर'बाबत पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, ऐन फेस्तदिवशी केलेल्या पोस्टमुळे वाद होण्याची शक्यता

Subhash Velingkar Contoversial Remark: आरएसएस गोवाचे माजी अध्यक्ष सुभाष वेलिंगकर यांनी झेवियर यांच्याबाबत पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. झेवियर शवदर्शन सोहळा आणि फेस्त सुरु असताना वेलिंगकरांनी पुन्हा वाद ओढावून घेतला आहे.

Manish Jadhav

पणजी: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या डिएनए चाचणीची मागणी करुन गोव्यात वादंग निर्माण करणाऱ्या, आरएसएस गोवाचे माजी अध्यक्ष सुभाष वेलिंगकर यांनी झेवियर यांच्याबाबत पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. झेवियर शवदर्शन सोहळा आणि फेस्त सुरु असताना वेलिंगकरांनी पुन्हा वाद ओढावून घेतला आहे.

काय म्हणाले वेलिंगकर?

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये वेलिंगकर म्हणाले की, ''छत्रपती संभाजी महारांजाचा हल्ला परतवून पोर्तुगिज साम्राज्याचे रक्षण केले, असा चमत्कार आजही चर्च ज्याच्या शवाच्या नावावर खपवते, तो पोर्तुगिज हस्तक, मुक्त गोव्याचा Partron Saint? हे लॉजिकच बेकार आहे. झेवियरला पोर्तुगालच्या राजाने आणि पोपने धर्मांतराद्वारे भारतात पोर्तुगिज साम्राज्य-बळकट करण्यासाठी पाठवले होते. ना की भारत (India) देशाच्या रक्षणासाठी, हे तर अडाण्यालाही माहिती आहे. हो ना...''

डिएनए चाचणीची मागणी केली होती

संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची डिएनए चाचणी करावी, अशी मागणी करुन सुभाष वेलिंगकरांनी राळ उडवून दिली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात राजकीय घमासान पाहायला मिळाले होते. वेलिंगकरांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत ख्रिस्ती संघटनांनकडून राज्यातील विविध पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

वेलिंगकरांचे वक्तव्य समाजात तेढ निर्माण करते असे म्हणत राज्यातील ख्रिस्ती संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. वेलिंगकरांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही असा पवित्राही या संघटनांनी घेतला होता. तर दुसरीकडे, वेलिंगकरांच्या वक्तव्याच्या समर्थनार्थही राज्यातील हिंदू संघटना एकवटल्या होत्या. वेलिंगकरांचे वक्तव्य बरोबर असून संत झेवियर यांच्या शवाची डिएनए चाचणी करण्यात यावी अशी मागणी त्यांनीही केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT