मध्य प्रदेशातील एक नेता आणि त्याच्या दोन मित्रांना गोव्यात कॉल गर्ल्सने बेदम मारहाण केली. नेता मध्यप्रदेशचा माजी मंत्री असल्याची माहिती समोर आली आहे. सहा मार्च रोजी कळंगुट येथील एका हॉटेलवरती ही घटना घडली.
(Madhya Pradesh Ex-Minister Beaten by call girls in Calangute)
झाले असे की मध्य प्रदेशातील एक नेता आणि त्याच्या दोन मित्रांसोबत फिरण्यासाठी गोव्यात आले होते. या नेत्याने एका दलालाच्या माध्यमातून मुंबईतून दोन कॉल गर्ल्स बोलावल्याचं सांगण्यात येत आहे. दलालाशी झालेल्या चर्चेपेक्षा कॉलगर्ल्स निर्धारित वेळेपूर्वी निघून जाऊ लागल्याने नेता आणि त्याच्या मित्रांचा कॉलगर्ल आणि दलालाशी वाद झाला.
पैसे देण्याची वेळ आली तेव्हा या नेत्याने दलालाच्या खात्यात ऑनलाइन रक्कम ट्रान्सफर केल्याचे सांगितले. दरम्यान, रक्कम मला मिळालीच नाही, असे दलाल म्हणाला.
दरम्यान, हा फुकटचंद नेता व त्याचे मित्र हॉटेलच्या वरच्या मजल्यावर त्यांनी घेतलेल्या भाड्याच्या खोलीत जाऊन लपून बसले. कॉलगर्ल्सनी त्यांना शोधून काढले आणि बेदम चोप दिला. पैसे न देताच हॉटेलमधून पोबारा करण्याचा त्यांचा डाव होता. पण, कॉलगर्ल्सनी त्यांना चांगलाच चोप दिला.
मध्य प्रदेशाचा माजी मंत्री असल्याने याप्रकरणी पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याची चर्चा कळंगुट परिसरात आहे. दरम्यान, या घटनेची माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या मारामारीत हॉटेलधील काही वस्तूंचीही मोडतोड झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी नेता आणि त्याचे मित्र दारूच्या नशेत होते. पण हा नेता कोण त्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.