Goa Assembly Election 2027
बाणावली: गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी दोन वर्षांचा अवधी शिल्लक असला तरी आजी - माजी आमदार आणि पराभूत उमेदवारही येत्या विधानसभेसाठी कंबर कसत आहेत. भाजपने नुकतेच प्रदेशाध्यपदी दामू नाईक यांना बसवून निवडणुकीच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे.
गेल्या वर्षाच्या अखेरीस मतदारसंघावरुन युतीमधील नेत्यांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले. अशात गोव्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठीचा प्लॅन जाहीर केला आहे.
माजी मुख्यमंत्री असणाऱ्या चर्चिल यांनी गेल्या निवडणुकीत बाणावलीतून पराभवाचा सामना करावा लागला होता. येत्या निवडणुकीत मात्र चर्चिल यांनी लढाईसाठी दोन पर्याय समोर ठेवल्याचे दिसते. चर्चिल आलेमाव यांनी बाणावली किंवा नावेलीतून लढण्याचा पर्याय खुला ठेवला आहे. दरम्यान, हा निर्णय समर्थक आणि लोकांच्या मतानुसार घेतला जाईल, असेही आलेमाव यांनी स्पष्ट केले.
महत्वाची बाब म्हणजे चर्चिल आलेमाव यांनी बाणावलीतून ते नाही लढल्यास त्यांच्या घरातून कोणीतरी निवडणूक लढवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे बाणावलीतून चर्चिल यांनी निवडणूक न लढवल्यास त्यांच्या घरातील एक चेहरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित आहे. आलेमाव यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्याने बाणावली आणि नावेलीतील लढाईचे चित्र देखील काहीसे स्पष्ट झाले आहे.
चर्चिल आलेमाव यांनी किंवा त्यांच्या कुटुंबातून कोणी बाणावलीतून निवडणूक लढवल्यास त्याच्यासमोर आपचे विद्यमान आमदार वेंझी व्हिएगस यांचे आवाहन उभे असेल. आणि त्यांनी नावेलीतून उमेदवारी अर्ज भरल्यास त्यांच्यासमोर उल्हास तुयेकर यांचे आवाहन असेल.
आलेमाव सध्या कोणत्याही पक्षात नाहीत त्यामुळे ते ऐनवेळी एखाद्या पक्षात प्रवेश करणार का अपक्ष निवडणूक लढणार याबाबत स्पष्टता नाही. पण, बाणावली मतदारसंघाने त्यांना नेहमीच पाठिंबा दिल्याचे म्हणत यावेळीही लोक ठाम उभी राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.