Goa Crime: पुणेकर उद्योगपतीला गोव्यात 11 लाखांचा गंडा; घर दुरुस्तीच्या नावाखाली उकळले पैसे
Goa Crime NewsDainik Gomantak

Shimla Crime: कृषी मंत्र्याच्या मुलाला एक लाखांचा गंडा; गोव्यात बनावट रिसॉर्ट बुकिंगच्या नावाखाली फसवणूक

Goa Cyber Crime: जाहिरातीसोबत दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधला आणि त्याच्या Google Pay खात्यावर 1 लाख रुपयांची आगाऊ रक्कम पाठवली.
Published on

Goa Cyber Crime

शिमला: हिमाचल प्रदेशचे कृषी मंत्री चंद्र कुमार यांचा मुलगा आणि माजी मुख्य संसदीय सचिव (CPS) नीरज भारती सायबर फसवणुकीचा बळी ठरले आहेत. गोव्यात रिसॉर्ट बुकिंगच्या नावाखाली नीरज भारती यांच्याकडून ठगांनी एक लाख रुपये उकळले.

याप्रकरणी त्यांनी छोटा शिमला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

नीरज भारतीनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, भारती यांनी नुकतेच गोव्याला जाण्याची योजना आखली होती. त्यासाठी त्यांनी 10 जानेवारी रोजी इंटरनेटवरुन रिसॉर्टची माहिती घेत असताना, त्यांनी 'कारा व्हिला रिसॉर्ट' नावाच्या रिसॉर्टची जाहिरात पाहिली आणि ती बुक करण्याचे ठरवले.

बुकिंगची पुष्टी करण्यासाठी, जाहिरातीसोबत दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधला आणि त्याच्या Google Pay खात्यावर 1 लाख रुपयांची आगाऊ रक्कम पाठवली. बुकिंग कन्फर्म दिसण्यासाठी सायबर चोरट्यांनी बुकिंगची बनावट पावतीही पाठवली.

Goa Crime: पुणेकर उद्योगपतीला गोव्यात 11 लाखांचा गंडा; घर दुरुस्तीच्या नावाखाली उकळले पैसे
Goa Paragliding: पॅराग्लायडिंग करताना दोरी तुटून दोघे कोसळले दरीत, पुण्यातील पर्यटक युवतीसह पायलट ठार

संपूर्ण प्रवासाचा एकूण खर्च 2,48,400 रुपये असल्याचे सांगण्यात आले. पण नीरज भारती यांनी रिसॉर्टबद्दल अधिक माहिती गोळा केली तेव्हा गोव्यात या नावाचे कोणतेही रिसॉर्ट अस्तित्वात नसल्याचे समोर आले.

नीरज भारती यांना फसवणुकीची जाणीव होताच त्यांनी छोटा शिमला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सायबर ठगांनी चतुराईने इंटरनेटवर रिसॉर्टच्या बनावट जाहिराती देऊन ही फसवणूक केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Goa Crime: पुणेकर उद्योगपतीला गोव्यात 11 लाखांचा गंडा; घर दुरुस्तीच्या नावाखाली उकळले पैसे
Panaji: मध्य पणजीतील वाहतूक तात्पुरती बंद! टोंककडे जाणारी वाहतूक वळवली, पर्यायी रस्त्यांची माहिती घ्या

फसवणूक करणाऱ्यांनी बुकिंग प्रक्रिया इतकी खरी आणि आकर्षक बनवली की कोणालाही संशय येणार नाही. ठगांनी कोणते तंत्रज्ञान वापरले आणि त्यांचा ठावठिकाणा कुठे आहे याबाबत सायबर क्राईम तज्ज्ञांच्या मदतीने पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com