Pratapsingh Rane video Dainik Gomantak
गोवा

माउथ ऑर्गनवर वाजवली राष्ट्रगीताची धून; प्रतापसिंग राणेंचा 'हा' व्हिडीओ सध्या होतोय Viral

Pratapsingh Rane viral video: गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याच्या राजकारणात एक मोठं नाव असलेले प्रतापसिंग राणे असाच एक व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे

Akshata Chhatre

Pratapsingh Rane Mouth Organ Video: राजकीय नेते म्हटलं की, त्यांच्या आयुष्यात राजकारण आणि जनसेवा या दोनच गोष्टी असतात असं नाही. अनेक नेते त्यांच्या राजकीय जीवनापलीकडेही काही खास छंद आणि कलांसाठी ओळखले जातात. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याच्या राजकारणात एक मोठं नाव असलेले प्रतापसिंग राणे असाच एक व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे.

माउथ ऑर्गनवरील राष्ट्रगीताची धून

आपल्या कणखर नेतृत्वासाठी आणि राजकीय दूरदृष्टीसाठी ओळखले जाणारे प्रतापसिंग राणे या व्हायरल व्हिडीओमध्ये चक्क माउथ ऑर्गन वाजवताना दिसत आहेत. केवळ माउथ ऑर्गनच नाही, तर त्यावर त्यांनी आपल्या देशाचं राष्ट्रगीत 'जन-गण-मन'ची धून अतिशय सुंदररित्या वाजवली आहे. त्यांच्या या अप्रतिम कलेमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एक कठोर राजकारणी म्हणून ज्यांना ओळखलं जातं, त्यांच्यातील ही कला पाहून नेटकरी त्यांचं तोंडभरून कौतुक करत आहेत.

एक धडाडीचे नेते, यशस्वी मुख्यमंत्री

प्रतापसिंग राणे यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत गोव्याच्या राजकारणावर आपली छाप सोडली आहे. वाळपई मतदारसंघाचे माजी आमदार म्हणून त्यांनी या भागाच्या विकासासाठी मोठं योगदान दिलं आहे. एवढंच नाही तर, राज्याचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांची कारकीर्द यशस्वी मानली जाते. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे ते वडील आहेत. राजकारणातील त्यांचा अनुभव आणि दूरदृष्टी नेहमीच आदर्श मानली गेली आहे. पण आता त्यांच्यातील संगीतप्रेमी पाहून त्यांची दुसरी ओळखही लोकांसमोर आली आहे.

व्हिडीओ झाला व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करत राणेंच्या या कलेची प्रशंसा केली आहे. एका राजकारण्याने अशा प्रकारे आपल्या कलेला वाव दिल्याने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. 'राजकारणासोबत कला जोपासणारे नेते', 'एक उत्तम व्यक्तिमत्त्व', अशा प्रतिक्रिया देऊन नेटकरी त्यांचं कौतुक करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोडकळीस आलेले घर अन् तुटलेले छत, अखेर मिळाला प्रेमाचा निवारा; 80 वर्षीय निराधर आजीच्या मदतीला धावले प्रशासन

हे काय घडलं शेवटच्या चेंडूवर? विजयासाठी 1 रनची गरज असताना ट्वीस्ट, हातची मॅच गमावली; Watch Video

2027 मध्ये गोव्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून देऊ, मंत्रिपदाची शपथ घेताच कामत, तवडकरांची हमी; लोबो दाम्पत्य, गावडे, बाबुशची कार्यक्रमाला दांडी

Viral Video: दोन बायका अन् सहा मुलांसह पठ्ठ्याचा बाइक प्रवास, सोशल मीडियावर देसी जुगाड व्हायरल; व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

India vs Pakistan: क्रिकेट चाहत्यांसाठी गुड न्यूज! भारत-पाकिस्तान यांच्यात होणार महामुकाबला, आशिया कपमधील लढतीला भारत सरकारचा ग्रीन सिग्नल

SCROLL FOR NEXT