Business License cancellation Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: राज्यात दरवर्षी 450 व्‍यापारी परवाने होतात रद्द, जीएसटी न भरण्‍याचा परिणाम, जमा न करणाऱ्यांविरोधात कारवाई

License cancellation Goa: राज्‍यात दरवर्षी जीएसटी (वस्‍तू व सेवा कर) न भरणाऱ्या सुमारे ४५० व्‍यापाऱ्यांचे परवाने रद्द होतात, तर सुमारे दोन हजार जणांना नव्‍याने परवाने देण्‍यात येतात.

Sameer Amunekar

पणजी : राज्‍यात दरवर्षी जीएसटी (वस्‍तू व सेवा कर) न भरणाऱ्या सुमारे ४५० व्‍यापाऱ्यांचे परवाने रद्द होतात, तर सुमारे दोन हजार जणांना नव्‍याने परवाने देण्‍यात येतात, अशी माहिती राज्‍य कर खात्‍याचे अतिरिक्त आयुक्त विशांत गावणेकर यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

काही वर्षांपूर्वी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जीएसटी जमा न करणाऱ्या व्‍यापाऱ्यांवर राज्‍य कर खात्‍यामार्फत कारवाईची मोहीम सुरू केली. त्‍यामुळे अनेकांनी वेळेवर जीएसटी भरण्‍यास सुरुवात केली आहे. तरीही विविध कारणांमुळे काही जणांकडून जीएसटीचा भरणा प्रत्‍येक महिन्‍याला होत नाही. अशांनी सलग सहा महिने जीएसटी न भरल्‍यास खात्‍याकडून त्‍यांना नोटिसा बजावण्‍यात येतात.

त्‍यानंतर त्‍यावर सुनावण्‍या सुरू करून त्‍यांना जीएसटी व्‍याजासह भरण्‍याची मुभा देण्‍यात येते. तरीही पुढील सहा महिने त्‍यांनी जीएसटी न भरल्‍यास त्‍यांचे परवाने रद्द केले जातात. दुसऱ्या बाजूला वैयक्तिक कारणांमुळे काही व्‍यापारी दुकाने, आस्‍थापने बंद करतात आणि स्‍वत:चे परवाने मागे घेतात.

अशाप्रकारे या दोन्‍ही कारणांमुळे दरवर्षी राज्‍यातील सुमारे ४५० व्‍यापाऱ्यांचे जीएसटी परवाने निलंबित होत आहेत. त्‍याचवेळी प्रत्‍येक वर्षी दोन हजार जणांना नव्‍याने परवाने देण्‍यात येत असल्‍याचेही गावणेकर यांनी नमूद केले.

संकलन वाढवण्‍यासाठी प्रयत्‍न : गावणेकर

राज्‍यातील बहुतांशी व्‍यापारी वेळेवर जीएसटीचा भरणा करत असल्‍यामुळे गेल्‍या काही वर्षांपासून जीएसटी संकलनात वाढ झाली आहे. त्‍याचा मोठा फायदा राज्‍याच्‍या महसुलास मिळत आहे. पुढील काळातही जीएसटी संकलनात वाढ व्‍हावी, यासाठी राज्‍य कर खाते प्रयत्‍नशील असल्‍याचेही विशांत गावणेकर यांनी स्‍पष्‍ट केले.

राज्‍यातील जीएसटी संकलनात दरवर्षी वाढ

राज्‍यात प्रत्‍येक वर्षी व्‍यापाऱ्यांची संख्‍या वाढत असल्‍यामुळे जीएसटी संकलनातही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. ऑगस्‍ट २०२५ मध्‍ये जीएसटीच्‍या माध्‍यमातून ५४५ कोटी रुपये प्राप्‍त झाले होते. गतवर्षी ऑगस्‍टमध्‍ये मिळालेल्‍या कराच्‍या तुलनेत यंदाच्‍या ऑगस्‍टमध्‍ये तीन टक्‍क्‍यांनी वाढ झालेली आहे. तरीही राज्‍यातील काही व्‍यापारी प्रत्‍येक महिन्‍याला जीएसटी जमा करण्‍याकडे दुर्लक्ष करतात. त्‍याचा परिणाम महसुलावर होत असल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: 'ओंकार' शेतमळ्यांच्या प्रेमात, तांबाेसेत वाढला मुक्काम; शेतकरी मात्र हैराण

Goa Murder Case: गोव्यात 64 वर्षीय वृद्ध महिलेचा चाकूने गळा कापला; आसामच्या 21 वर्षीय तरुणाला अटक

Guirim Road Issue: गिरीतून जात आहात...तर सावधान! महामार्गावर लोखंडी सळ्या व खड्डे; दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Success Story: खेडेगावात जन्मलेली मुलगी 'कर्करोगा'वर करतेय संशोधन, गोव्याच्या 'चिन्मयी प्रभुदेसाई'च्या यशाची कहाणी

Makharotsav Navratri in Goa: गोव्यातील मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवात साजरा होणारा 'मखरोत्सव', भक्ती आणि परंपरेचा भव्य संगम

SCROLL FOR NEXT