Every city should have a senior citizen center, according to senior citizens
Every city should have a senior citizen center, according to senior citizens Dainik Gomantak
गोवा

Goa News: प्रत्येक शहरात ज्येष्ठ नागरिक केंद्र हवेच! ज्येष्ठांचे मत

दैनिक गोमन्तक

ज्येष्ठ नागरिकांनी हयातीत आपले कर्तृत्‍व सिद्ध केलेले असते. मात्र, वयाच्या साठीनंतर त्यांना सरकार निवृत्त ठरवते. त्यांना सरकारी सुविधा, विमा मिळत नाही, एकप्रकारे वाळीत टाकले जाते. ज्येष्ठांना आपले हक्क मिळवण्यासाठी, सन्मानाने जीवन व्यतित करण्यासाठी राज्यस्तरीय

संघटना स्थापन करणे गरजेचे असून त्याद्वारे राज्यातील प्रमुख शहरात ज्येष्ठ नागरिक केंद्रे उभारणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक सुहास सरदेसाई यांनी केले.

ते ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांच्या गोमन्तक टीव्हीवरील ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात बोलत होते. यात कार्यक्रमात दिनार भाटकार, पिंकी हिराणी, अल्पा शहा तथा लोकवेद अभ्यासक डॉ. पांडुरंग फळदेसाई यांनी सहभाग घेतला होता.

दरम्यान सरदेसाई म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी सरकारी अस्थापने तथा शाळा आहेत जेथे अशा प्रकारचे ज्येष्ठ नागरिक केंद्र आपण स्थापन करू शकतो. जेथे ज्येष्ठ एकत्र येतील.

अशा आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या...

  1. वयाच्या साठीनंतर प्रत्येक नागरिकाला मिळावी पेन्शन

  2. रेल्वे तसेच विमान प्रवासात मिळावी ५० टक्के सवलत

  3. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा आरोग्य विमा असावा

  4. न्यायालयात खटल्यांमध्ये ज्येष्ठांना प्राधान्य हवे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

SCROLL FOR NEXT