Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Jammu & Kashmir: जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात सोमवारी दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या ताफ्यावर अचानक हल्ला केला.
Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी
Jammu & Kashmir Terrorist AttackDainik Gomantak

जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात सोमवारी दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या ताफ्यावर अचानक हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनीही प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंकडून झालेल्या गोळीबारात लष्कराचे चार जवान ठार झाले तर 6 जण जखमी झाले. जिल्ह्यातील माचेडी परिसरात ही घटना घडली. हे क्षेत्र भारतीय लष्कराच्या 9 कॉर्प्स अंतर्गत येत असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या लष्कराकडून सर्च ऑपरेशन राबवले जात आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कुलगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली होती. या चकमकीत एकूण 8 दहशतवादी मारले गेले होते. एलिट पॅरा युनिटचे लान्स नाईक प्रदीप कुमार आणि राष्ट्रीय रायफल्स बटालियनचे कॉन्स्टेबल प्रवीण जंजाल प्रभाकर हे मोदेरगाम आणि चिन्निगाम गावात झालेल्या चकमकीत शहीद झाले. जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक आरआर स्वेन यांनी सांगितले की, 'दहशतवाद्यांचा खात्मा हा सुरक्षा दलांसाठी एक मोठा मैलाचा दगड आहे, कारण त्यामुळे परिसरातील सुरक्षा मजबूत होईल. सुरक्षा मजबूत करण्यासाठी हे यशस्वी ऑपरेशन्स खूप खास आहे.'

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी
Jammu Kashmir Accident: जम्मूच्या अखनूरमध्ये भीषण अपघात, भाविकांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली; 16 ठार, 28 जण जखमी

रविवारी लष्करी चौकीवर हल्ला झाला होता

रविवारी राजौरी जिल्ह्यातील एका गावात दहशतवाद्यांनी सुरक्षा चौकीवर गोळीबार केला होता, ज्यामध्ये लष्कराचा एक जवान जखमी झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी पहाटे चारच्या सुमारास मांजकोट भागातील गलुथी गावात लष्कराच्या चौकीवर गोळीबार केला, त्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनी प्रत्युत्तर दिले. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, दहशतवादी आणि जवानांमध्ये सुमारे अर्धा तास चकमक चालली, ज्यामध्ये लष्कराचा एक जवान जखमी झाला. मात्र, दहशतवादी जवळच्या जंगलात पळून गेले. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन राबवण्यात आले.

डोडा येथे 3 दहशतवादी ठार

26 जून रोजी डोडा जिल्ह्यातील गंडोह भागात सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. सकाळी या भागात 2-3 दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि लष्कराने शोध मोहीम सुरु केली होती, त्यानंतर सकाळी 9.50 वाजता चकमक सुरु झाली. या चकमकीत जम्मू-काश्मीर पोलिस दलातील विशेष ऑपरेशन ग्रुपचा एक जवानही जखमी झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com