Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

Pernem News: सध्या भर पावसात वाऱ्यावादळाचा तडाखा सहन करत विद्यार्थ्यांना थांबावे लागते
Pernem News:  सध्या भर पावसात वाऱ्यावादळाचा तडाखा सहन करत प्रवाशांना थांबावे लागते
HighwayCanva
Published on
Updated on

गोवा मुंबई महामार्ग वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असताना आता त्यात आणखी एका समस्येची भर पडली आहे. महाखाजन-धारगळ ते पत्रादेवीपर्यंत या महामार्गावर स्थानिक प्रवाशांसाठी एकही निवारा शेड उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांचे विशेषतः: विद्यार्थ्यांचे बरेच हाल होत आहेत.

सध्या तर भर पावसात वाऱ्या वादळाचा तडाखा सहन करत प्रवाशांत बसची वाट पाहत थांबावे लागते. याबाबत विर्नोडाचे माजी सरपंच ॲड. सीताराम परब यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

परब यांनी सांगितले की, पेडणे तालुक्यातून जाणाऱ्या या महामार्गावर स्थानिक प्रवाशांसाठी कुठेच निवारा शेड उभारलेली नाही. मात्र बार्देश तालुक्यातील कोलवाल येथे अनेक ठिकाणी निवारा शेड उभारलेल्या आहेत. पेडणे तालुक्याच्या बाबतीत ही सापत्नभावाची वागणूक का, तसेच याबाबत पेडण्याचे आमदार गप्प का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

गोवा मुंबई राष्ट्रीय महामार्गाचे पत्रादेवीपासून ते म्हापसापर्यंतचे बांधकाम सदोष झाल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. या महामार्गावरील कठडे कोसळलेले आहेत. तसेच रस्त्याच्या बाजूला उभारलेल्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाबाबतही प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. रस्त्याला भेगा त्यामुळे वाहने हाकताना वाहनचालकांना समस्यांना तोंड द्यावे लागते.

स्थानिकांच्या गैरसोयींकडे दुर्लक्ष

हा महामार्ग उभारताना स्थानिकांच्या समस्या व गैरसोयीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आवश्‍यक ठिकाणी वाहतूक बेट, तसेच रस्ता क्रॉसिंगची सोय आदींकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेकांना नाहक आपले प्राण गमवावे लागले आहेत, याकडे परब यांनी लक्ष वेधले.

Pernem News:  सध्या भर पावसात वाऱ्यावादळाचा तडाखा सहन करत प्रवाशांना थांबावे लागते
Mumbai Goa Highway: गणेश चतुर्दशीपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करा; नारायण राणेंनी घेतली नितीन गडकरींची भेट

सरकार, आमदारांचे दुर्लक्ष

सरकार तसेच स्थानिक आमदाराला लोकांच्या समस्यांमध्ये रस दिसून येत नाही. सध्या पत्रादेवी ते धारगळपर्यंत प्रवास केला तर अनेक प्रवासी भर पावसात वादळी वाऱ्याचा तडाखा सहन करून रस्त्याच्या बाजूला छत्री घेऊन थांबलेले दिसतात. यात विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. ही समस्या त्वरित सोडवण्यात यावी, अशी मागणी परब यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com