राज्यात मुसळधार पाऊस पडतोय. चिखलीत मुसळधार पावसामुळे इनडोअर स्टेडियमची संरक्षित भिंत कोसळली.
राज्यात पावसाचा जोर कायम आहे. मंडूप येथे एका दुर्देवी घटनेत घराची भिंत कोसळल्याने माय लेक ठार झाले. अग्निशामन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढले आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, हळदोणा आमदार कार्लुस फेरेरा, केपे आमदार आल्टन डिकोस्ता, सरचिटणीस जितेंद्र गावकर, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर यांनी पेडणेतील राष्ट्रीय महामार्ग 66 वरील दरड कोसळलेल्या ठिकाणी भेट दिली.
पक्षाच्या आदेशाप्रमाणे मी मंत्रीपद सोडले. मी कधीच बंडखोरी केलेली नाही. भाजप हा हुशार पक्ष आहे. कोणाला काय द्यायचे ते पक्ष ठरवेल. मुख्यमंत्रीपदाची संधी दिल्यास तीही स्वीकारण्यास मी तयार. माझी क्षमता मी सिद्ध केलीय. लोकांनाही ठाऊक आहे. मंत्रीमंडळ फेररचनेच्या चर्चांवर निलेश काब्रालांचे प्रतिपादन.
पिळगावच्या कोमुनिदाद आणि शेतकऱ्यांचा विरोध असतानाही, 'वेदांता'च्या खनिज वाहतुकीचा मार्ग तूर्त मोकळा. डिचोलीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत तात्पुरता तोडगा निघाला. खाण खात्याकडून दिलेल्या परवान्याच्या आधारावर मान्यता देण्यात आली. परवान्याला कोर्टात आव्हान देण्याचा कोमुनिदाद आणि शेतकऱ्यांचा निर्णय.
राज्यात मागील काही दिवसांपासून आसगाव घर मोडतोड प्रकरण चांगलेच गाजत आहे. यातच, या प्रकरणातील संशयित पूजा शर्मा हीच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. पणजी प्रधान सत्र न्यायालय आता येत्या बुधवारी (10 जुलै) निर्णय सुनावणार आहे. या घटनेमागे पूजा शर्मा हीच मुख्य सूत्रधार असल्याचे केलेल्या प्रथमदर्शनी तपासात दिसून येत असल्याने तिची पोलिस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांसोबत भाजपसह सरकारपक्षाला पाठींबा दिलेले मित्र पक्ष आणि अपक्षांची बैठक पार पडली. ज्यामध्ये मंत्री गावडे, सिक्वेरा आणि हळर्णकर बैठकीतून सर्वात आधी निघाले.
फोंडयात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. यातच फोंड्यातील सप्तकोटेश्वर मंदिराच्या भोवती पाणीच पाणी साचले. गेल्या वर्षीसुद्धा या मंदिराभोवती पाणी भरले होते.
राज्यात सध्या मुसळदर पाऊस पडत आहे. यातच, उसगाव येथे नव्यानेच हॉटमिक्सिंग केलेला रस्ता खचला. त्यामुळे आता वाहतूक बंद करण्यात आली आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधारा पाऊस पडत आहे. यातच, धारगळ राष्ट्रीय महामार्ग 66 वरील दरड कोसळली. गेल्या वर्षीही मोठ्याप्रमाणात दरडी कोसळल्या होत्या. सरळ रेषेत डोंगर कापले जात असल्याने दरडी कोसळल्या जात आहेत.
फोंडा प्रभुनगर येथील फ्लॅटमध्ये अज्ञात व्यक्तीने मोठा डल्ला मारला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.