Kulithalai Alina Saldanha Dainik gomantak
गोवा

'मी कुठ्ठाळीची आमदार नसले तरी, डांबरीकरणासाठी पुढाकार घेतला'

आम आदमी पक्ष लोकहितासाठी काम करण्याबरोबरच उत्तम प्रकारे विकास करणारा पक्ष

दैनिक गोमन्तक

एमईएस कॉलेजजवळील विद्यानगर येथील रेल्वे कॉलनी परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या दुरुस्ती-डांबरीकरण कामाच्या पायाभरणी समारंभाला माजी आमदार एलिना साल्ढाना (Alina Saldanha) उपस्थित होत्या. येथील रस्त्याची 36 लाख रुपये खर्चून दुरुस्ती आणि डांबरीकरण केले जाणार असल्याची माहिती साल्ढाणा यांनी दिली. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी 'आता मी कुठ्ठाळीची आमदार (MLA) नसले तरी या रस्त्याचे डांबरीकरण काम व्हावे यासाठी पुढाकार घेतला होता' असे सांगितले.

आप पक्षाने दिलेल्या तिकिटाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. "आम आदमी पक्ष (AAP) लोकहितासाठी काम करण्याबरोबरच उत्तम प्रकारे विकास करणारा पक्ष आहे. याची प्रचीती मी दिल्लीत पाहिली आहे,' असे त्या म्हणाल्या.

गेल्या पाच वर्षांत कुठ्ठाळी मतदारसंघात (constituency) मी केलेला विकास, लोकांच्या हितासाठी केलेली कामे जनतेने पाहिली आहेत. अनेक कामे पूर्ण झाली असून काही सुरू आहेत. आप विकास करणारा पक्ष असल्याची जाणीव मोठ्या प्रमाणात नागरिकांना झाल्याने कुठ्ठाळीच्या नागरिकांकडून मला उत्तम पाठिंबा मिळत असल्याचे साल्ढाणा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT