Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Rohan Khaunte: स्मार्टसिटीच्या कामांमुळे मंत्रीही वैतागले; पर्यटन मंत्री रोहन खंवटे काय म्हणाले वाचा...

स्मार्ट सिटीची कामे हा महत्वाचा मुद्दा

Akshay Nirmale

Rohan Khaunte: पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामामुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनधारकांना तर त्रास होतच आहे, पण लोकप्रतिनिधीही शहरातील रस्तेकामांमुळे त्रासले आहेत. खुद्द पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनीच याबाबत त्यांची व्यथा मांडली आहे.

गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज, सोमवारपासून सुरवात झाली आहे. त्यापुर्वी पर्यटन मंत्र्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना याबाबत मत व्यक्त केले.

गोव्यातील वाहतूक कोंडीला स्मार्ट सिटीची कामे जबाबदार आहेत का, असे विचारले असता मंत्री खंवटे म्हणाले की, स्मार्ट सिटीची कामे हा पणजीतील मोठा मुद्दा बनला आहे. मला स्वतःलाही दुचाकी घेऊन फिरावे लागते. जो त्रास सर्वांना भोगावा लागत आहे तो आमदारांनाही भोगावा लागत आहे, असे ते म्हणाले.

पर्यटक हे आमच्यासाठी अतिथी आहेत. प्रत्येक पर्यटक वाईट नसतो. आणि प्रत्येकवेळी स्थानिकही चुकीचे नसतात. कुणीही कायदा हातात घेऊ नये. कारवाईसाठी पोलिस आहेत. पर्यटकांवरील हल्ल्याच्या घटना भविष्यात घडू नयेत. पर्यटन क्षेत्रातील बेकायदा गोष्टी अजिबात मान्य करणार नाही. बेकायदा टॉवर्सना विरोध आहे गोवेकरांची कमाई व्हावी, त्यांनी चांगले कमवावे, असाच आमचा हेतू आहे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT