Ethanol will be tested at Sanjivani Sugar Factory in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील ‘संजीवनी’त होणार इथेनॉलचा प्रयोग

पुण्याच्या डेक्कन शुगर टेक्‍नॉलॉजिस्‍टच्‍या प्रस्तावाला गोवा मंत्रिमंडळाची मंजुरी

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील संजीवनी साखर कारखान्यात (Sanjivani Sugar Factory in Goa) साखर निर्मिती बरोबर पेट्रोलसाठी लागणाऱ्या इथेनॉलची (Ethanol Test) निर्मिती करण्यात येणार आहे. या इथेनॉल निर्मिती प्रकल्पासाठी पुण्याच्या डेक्कन शुगर टेक्‍नॉलॉजिस्टची (Deccan Sugar Technologist from Pune) मदत घेण्यात येत आहे. त्याला राज्य मंत्रिमंडळाने (Goa Cabinet) मंजुरी दिल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant)यांनी दिली.

दयानंदनगर - धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखाना कायम तोट्यात असल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने आता नवीन पर्याय शोधला असून, साखर निर्मिती बरोबरच इथेनॉलची निर्मिती करण्यात येणार आहे. या इथेनॉल निर्मिती प्रकल्पासाठी पुण्याच्या डेक्कन शुगर टेक्‍नॉलॉजिस्ट असोसिएशनची मदत घेण्यात येत असून, या संबंधीचा अहवाल बनविण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून 20 कोटी रुपयांचे अनुदान मिळणार असून, हा प्रकल्प फायद्यात चालू शकतो, अशी आशा आहे. संजीवनी कारखान्‍यात इथेनॉल निर्मितीसाठी लागणारा ऊस गोव्‍याबरोबरच इतर राज्यांतून आणला जाण्याची शक्यता आहे.

पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण केले, तर पेट्रोलचे दर कमी होऊ शकतात. वास्तविक पेट्रोल मध्ये 20 टक्‍क्यांपर्यंत इथेनॉलचे मिश्रण करता येते मात्र, पुरेशा प्रमाणात इथेनॉल उपलब्ध नसल्याने सध्या पेट्रोलमध्‍ये केवळ 8 टक्केच इथेनॉल घातले जाते. हे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते, ज्यामुळे पेट्रोलचे दर कमालीचे खाली येणे शक्‍य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

SCROLL FOR NEXT