गोव्यातील साखरेची ‘संजीवनी’ आता करणार इथेनॉलची निर्मिती

राज्यातील एकमेव संजीवनी साखर कारखान्यातील साखर निर्मिती बंद करून पेट्रोलसाठी लागणाऱ्या इथेनॉलच्या निर्मितीवर भर देण्यात येणार आहे.
Goa Sanjivani Sugar Factory sends letter to Deccan Sugar Technologists Association in Pune
Goa Sanjivani Sugar Factory sends letter to Deccan Sugar Technologists Association in PuneDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: राज्यातील (Goa) एकमेव संजीवनी साखर कारखान्यातील साखर (Goa Sanjivani Sugar Factory) निर्मिती बंद करून पेट्रोलसाठी लागणाऱ्या इथेनॉलच्या निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. या इथेनॉल (Ethanol) निर्मिती प्रकल्पासाठीचा प्राथमिक अहवाल तयार करण्यासाठी एक पत्र संजीवनीतून पुण्यातील डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट असोसिएशनला (Deccan Sugar Technologists Association in Pune) पाठवण्यात आले आहे. संजीवनीचे प्रशासक चिंतामणी पेरणी यांनी हे पत्र पाठवले आहे.

दयानंदनगर - धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखाना कायम तोट्यात असल्याने सरकारने आता हा नवीन पर्याय शोधला आहे. यासंबंधी संजीवनीचे प्रशासक चिंतामणी पेरणी यांना विचारले असता साखर निर्मितीत कारखान्याला नुकसान होत असल्याने हा उत्तम पर्याय ठरू शकतो, असे त्यानी सांगितले.

Goa Sanjivani Sugar Factory sends letter to Deccan Sugar Technologists Association in Pune
Goa Elections: नेत्यांनी घेतली शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांची भेट

पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण केले, तर पेट्रोलचे दर कमी होऊ शकतात. वास्तविक पेट्रोलमध्ये 20 टक्के पर्यंत इथेनॉलचे मिश्रण करता येते. मात्र, पुरेशा प्रमाणात इथेनॉल उपलब्ध नसल्याने सध्या पेट्रोलमध्ये केवळ 8 टक्केच इथेनॉल घातले जाते. हे प्रमाण 20 टक्के पर्यंत जाऊ शकते ज्यामुळे पेट्रोलचे दर कमालीचे खाली येऊ शकतात. केंद्र सरकारने भविष्यात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण 20 टक्क्यांपर्यंत ठेवल्याने उसापासून इथेनॉल निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. संजीवनीत इथेनॉल निर्मितीसाठी लागणारा ऊस राज्याबरोबरच इतर राज्यातून आणण्याची शक्यता आहे. संजीवनीत साखरेऐवजी इथेनॉल निर्मिती केली, तर कारखानाही नफ्यात येणार आहे त्यामुळे सरकारने या प्रकल्पावर भर दिला आहे. दरम्यान, इथेनॉल निर्मिती प्रकल्पासाठी संजीवनीने पुण्याला पाठवलेल्या पत्राच्या प्रती मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री कार्यालयालाही पाठवण्यात आल्या आहेत.

Goa Sanjivani Sugar Factory sends letter to Deccan Sugar Technologists Association in Pune
Goa Taxi: डिजिटल मीटर्स न बसविणाऱ्यांसाठी...

संजीवनीला नवसंजीवनी

संजीवनी कायम तोट्यात असल्याने पाच वर्षांपूर्वी या साखर कारखान्यात डिस्टिल्ड वॉटर प्रकल्प सुरू करण्याचे तत्कालीन सरकारने ठरवले होते, पण नंतर हा प्रस्ताव मागे पडला. आताही इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचा योग्य पाठपुरावा झाला तर कदाचित संजीवनीसाठी ती नवसंजीवनी ठरू शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com