Margao Municipal Council Gomantak Digital Team
गोवा

Margao Municipal Council: मडगावमध्ये परवान्याशिवाय बिनधास्त चालतात आस्थापने

सर्वेक्षणाचा काय फायदा? : पालिकेला कोट्यवधींना चुना

दैनिक गोमन्तक

मडगावमध्ये कार्यरत असलेल्या हजारो व्यावसायिक आस्थापनांचे सर्वेक्षण पूर्णत्वाकडे पोहोचल्याचे पालिकेच्या गोटातून सांगण्यात येते. मात्र, त्यातील सध्या कित्येक आस्थापने व्यावसायिक परवाना नसतानाही बिनदिक्कत सुरू आहेत. अशा आस्थापनांवर कारवाई होणार की नाही, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यापूर्वी परवाने नसतानाही व्यवसाय करणाऱ्यांचे सर्वेक्षण केले होते. मात्र, त्यानंतर काहीच हालचाल झालेली नाही. अशाच प्रकारची स्थिती या व्यावसायिक आस्थापनांच्या बाबतीतही होणार का, असा प्रश्र्न विचारला जात आहे. जो सर्वे केला आहे, त्याप्रमाणे एकाच प्रभागात ३० ते ४० टक्के व्यवसाय परवाने नसताना सुरू आहेत.

पालिकेच्या न्यू मार्केट आणि गांधी मार्केटमध्येही विनापरवाना व्यवसाय सुरू आहेत. शिवाय या मार्केटमधील व्यावसायिक शुल्क अतिशय कमी आहे. ते वाढविण्यात आलेले नाहीत. काही व्यावसायिक तर केवळ १० ते १५ रुपये शुल्क देतात. त्यामुळे या शुल्कामध्ये वाढ करण्याशिवाय पालिकेला गत्यंतर नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT