Establishment of grand food court by cm Pramod Sawant in goa state Dainik Gomantak
गोवा

राज्यात भव्य फुड कोर्टची उभारणी

गोवा बाजार संकुलाची मुख्यमंत्र्यांच्या हस्‍ते पायाभरणी : रोजगाराचे आणखी एक दालन खुले

दैनिक गोमन्तक

पणजी: ग्रामीण विकास विभागाद्वारे बहुप्रतिक्षित गोवा बाजार संकुलाची पायाभरणी काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी सावंत म्हणाले की, गोव्यातील महिला, खासकरून स्वयंसाहाय्य गटाच्या सदस्यांना गोवा बाजार संकुल कधी होणार याची प्रतीक्षा लागून राहिली होती. आज या प्रकल्पाची पायाभरणी होत असून ग्रामीण विकास खात्याने या संकुलाच्या बांधकामासाठी 17 कोटी रुपये मंजूर केले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे अठ्ठेचाळीस कोटी रुपये लागणार असून 17 हजार 400 चौरस मीटर जागा या प्रकल्पासाठी लागणार आहे. या प्रकल्पात ग्रामीण विकास खात्याचे कार्यालय, बाजार संकुल व फुड कोर्ट उभारण्यात येणार आहे. (Establishment of grand food court by cm Pramod Sawant in goa state)

महिलांना खाद्यपदार्थांसह त्‍यांच्या सर्व वस्तू या संकुलात विकता येतील. हे संकुल म्हणजे स्वयंपूर्ण गोव्याच्या (Goa) दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. येणाऱ्या एक ते दीड वर्षात या संकुलाचे काम पूर्ण होईल. त्यामुळे गोवा बाजार संकुल परिसरातील नागरिकांना रोजगार प्राप्त होईल. ग्रामीण विकास खाते उत्कृष्टरित्या काम करत आहे. ग्रामीण महिलांना रोजगार कसा मिळेल, त्यांना कशा रितीने प्रोत्साहन देता येईल, यासाठी सतत झटत आहे. या संकुलात वस्तू विकण्यासाठी महिलांना भाडे द्यावे लागणार नाही. येथे वस्तू विकण्यासाठी स्वयंसाहाय्य गटांना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाशी संलग्न व्हावे लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी (CM Pramod Sawant) सांगितले. या कार्यक्रमाला अनिल होबळे, गिरीश उस्कैकर, सरपंच गीता कवळेकर, शासकीय खात्यांचे अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

...तर आणखी विकास झाला असता : फर्नांडिस

यावेळी सांताक्रुझ मतदारसंघाचे आमदार टोनी ऊर्फ ॲंटोनियो फर्नांडिस म्हणाले की, या गोवा बाजार संकुल प्रकल्पामुळे महिलांना एकाच ठिकाणी आपल्या वस्तू विकता येतील. माझ्या मतदारसंघात 82 कोटींची विकासकामे झाली. मी पूर्वीच भाजपमध्ये (BJP) आलो असतो तर आणखी विकास झाला असता. गोवा बाझार संकुल जेथे होत आहे, तेथे पावसाळ्यात पाणी साचते. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य तो उपाय योजावा, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

Sheikh Hasina Press Conference: 'मी जेल आणि मृत्यूला घाबरत नाही!', शेख हसीना यांचा मायदेशी परतण्याचा थेट इशारा; भारतातील पत्रकार परिषदेने उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT