Stray cattle
Stray cattle  Dainik Gomantak
गोवा

भटक्या गुरांसाठी ‘हेल्पलाईन’ स्थापन करा

दैनिक गोमन्तक

पणजी: रस्त्यावरील भटक्या गुरांच्या समस्येसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात प्रलंबित असलेल्या अर्जावरील सुनावणीवेळी ॲमिक्यूस क्युरीनी चोविस तास हेल्पलाईन सुरू करण्याबरोबरच पालिका व पंचायतींना रस्त्यावर गुरे येणार नाहीत, यासाठी गस्ती कर्मचारी नियुक्त करण्याची तसेच विविध शिफारशी केल्या आहेत. या शिफारशींबाबत उपाययोजना करण्याची माहिती देण्यासाठी गोवा खंडपीठाने पालिका व पंचायतीला मुदत देत पुढील सुनावणी 29 मार्चला ठेवली आहे. (Establish a helpline for stray cattle in goa)

रस्त्यावर गुरे येत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे तसेच अपघातात जखमी होणाऱ्या या गुरांवर कोणतेच उपाय करण्यासाठी पालिका किंवा पंचायतीकडे काहीच उपाययोजना नसल्याने त्यासंदर्भात निर्देश देण्यासाठी कबीर रॉय यांनी 2017 साली अर्ज सादर केला आहे. 2004 साली गोवा (Goa) खंडपीठाने भटक्या गुरांच्या समस्येसंदर्भातची याचिका निकालात काढताना अनेक निर्देश दिले आहेत मात्र त्या निर्देशांची अंमलबजावणी झाली नसल्याचे अर्जाद्वारे निदर्शनास आणून दिले होते.

त्यानंतर खंडपीठाने सर्व संबंधित खात्यांची तसेच ॲमिक्यूस क्युरी याना एकत्रित बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार त्या बैठकीतील शिफारशींची माहिती खंडपीठात सादर केली. चोविस तास हेल्पलाईन स्थापन करून उत्तर व दक्षिण गोवा यासाठी वेगवेगळे क्रमांक प्रसिद्ध करण्यात यावेत. येणाऱ्या तक्रारींची नोंदणी करून त्याची माहिती संबंधित क्षेत्रातील पोलिसांना (Goa Police) दिली जावी व रस्त्यात अडथळा होणाऱ्या गुरांना हाकलावे. अपघातात जखमी झालेल्या गुरांना उपचारासाठी नेण्यासाठी पावले उचलावीत. पशु संवर्धन खात्यानेही चोविस तास सेवा सुरू ठेवावी. या गुरांना ताब्यात घेऊन त्यांना जवळच्या पशु संवर्धन केंद्रात किंवा कोंडवाड्यामध्ये नेण्यासाठी हायड्रोलिक लिफ्ट असलेली वाहने दोन्ही जिल्‍ह्यासाठी उपलब्ध करावीत.

गोवा भटकी गुरे (Stray cattle) व्यवस्थापन योजनेखाली देण्यात येणारा निधी गुरांचा सांभाळ करणाऱ्या एनजीओ किंवा खासगी केंद्राना वेळेत दिला जावा. सर्व पालिका व पंचायतींना गुरांसाठी कोंडवाडे उभारण्याचे निर्देश द्यावेत. हे कोंडवाडे वैयक्तिक किंवा संघटितपणे पालिका किंवा पंचायती उभारू शकतात. पालिका व पंचायतींनी त्यांच्या क्षेत्रातील रस्त्यावरील भटक्या गुरांना हाकलण्यासाठी कर्मचारी नेमावेत. ज्या गुरांना ताब्यात घेण्यात येईल त्यांच्यावर कोणी मालकी हक्क दाखल न केल्यास या गुरांना गोशाळेत पाठवण्यासाठी वाहन उपलब्ध केले जावे. रस्त्यावर आढळून आलेल्या भटक्या गुरांचा मालकी हक्क सांगणाऱ्या मालकाविरुद्ध कायद्यानुसार कारवाई केली जावी, अशा अनेक शिफारशी ॲमिक्यूस क्युरीनी केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

High Court Order: वृद्ध सासूसोबत राहण्यास पत्नीचा नकार; उच्च न्यायालयाने दिला घटस्फोटाचा आदेश

SCROLL FOR NEXT