World Mental Health Day 2023 Dainik Gomantak
गोवा

World Mental Health Day 2023: गोव्यातील आत्महत्येचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त!

World Mental Health Day 2023: शारीरिक स्वास्‍थ्‍यासोबत मानसिक आरोग्य तितकेच महत्त्वाचे

दैनिक गोमन्तक

योगेश मिराशी

World Mental Health Day 2023: ऑक्टोबर 10 हा जागतिक मानसिक आरोग्यदिन म्हणून पाळला जातो आणि यंदाची थिम आहे, ‘मानसिक आरोग्य हा मानवी सार्वत्रिक अधिकार’.

मानसिक आरोग्याच्या स्थिती असणे हे एखाद्या व्यक्तीला त्यांच्या मानवी हक्कांपासून वंचित ठेवण्याचे किंवा त्यांच्या स्वतःच्या आरोग्याविषयीच्या निर्णयांपासून वगळण्याचे कारण असू शकत नाही, यासाठीच यंदाची वरील थिम ठेवण्यात आली आहे.

स्टिग्मापोटी मनातच समस्या कोंडून ठेवल्यास त्याचा मानसिक आरोग्यावर शारीरिक त्रासपेक्षा अधिक विपरीत प्रभाव पडतो. चांगले मानसिक आरोग्य हे आपल्या एकूण आरोग्यासाठी आवश्यक आहे.

जागतिक स्तरावर आठपैकी एक व्यक्ती मानसिक आरोग्य स्थितीसह जगतोय. मानसिक आरोग्याच्या परिस्थितीमुळे किशोरवयीन व तरुण लोकांच्या वाढत्या संख्येवर देखील परिणाम होताहेत.

डॉ. प्रियांका सहस्त्रभोजनी म्‍हणतात...

  • गोव्यातील आत्महत्येचे प्रमाण हे येथील लोकसंख्येमधील राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. याची नेमकी कारणे काय याचे संशोधन झालेले नाही.

  • देशातील ज्या शहरात राष्ट्रीय सरासरीपेक्षा आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे, तिथे साक्षरता जास्त. गोव्यासाठी विशेष असे संशोधन झालेले नाही. परंतु, देशात ज्याप्रकारचे मानसिक आरोग्याचे प्रश्न भेडसावतात, तेच आजार गोव्यात आहेत.

  • सध्या लोकांमध्ये समाधनाची भावना कुठेतरी कमी पडताना दिसते. शरीरात काही दुखले तर त्यावर लगेच उपचार घेतला जातो. परंतु, तुलनेत बहुतांश वेळा मानसिक आजारांकडे दुर्लक्ष केले जाते.

  • कारण मनाची काळजी कुणीच घेत नसतो. मुळात असे कुणीही करु नये आणि सुरवातीलाच मानसोपचार किंवा डॉक्टरची मदत घेणे कधीही चांगले.

  • उशिराने उपचार घेतल्यास मग उपचारपद्धती लागू होत नाही, असे अनेकांना वाटते. परंतु योग्यवेळी सल्ला व उपचार घेतल्यास या आजारातून बरे होता येते.

  1. सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वांनाच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. स्टिग्मा, चिंता, स्मृतिभ्रंश, नैराश्य यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे.

  2. अशावेळी मानसिक समस्यांवर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे, असे मनसोपचार तज्ज्ञ सांगतात.

  3. शारीरिक आजारांवर जितकी काळजी घेतली जाते, तितकीच काळजी मानसिक संतुलन बिघडल्यावर घेणे गरजेचे असून लोकांमध्ये जागृतीची आवश्यकता आहे.

योग्य आहारासोबत, हवा व्यायाम व योग

अलीकडे बारीकसारीक गोष्टींमुळे अनेकजण नाराज होतात. त्याचा नकळत त्रास होतो. त्यामुळे लोक एकटे राहतात. अशावेळी होणाऱ्या त्रासाविषयी आपल्या जवळील व्यक्तीशी व्यक्त होणे गरजेचे.

योग्य आहारासोबत, व्यायाम व योग केला पाहिजे. मनःशांती व निरोगी आरोग्यासाठी नियमित योग व ध्यानधारणा महत्त्वाची. त्याचप्रमाणे, अनेकजण तणावाखाली व दबावामध्ये जगताना दिसताहेत.

मग, फॅमिली प्रेशर असो किंवा वर्क प्रेशर. अपेक्षापूर्तीत अनेकजण आपले मानसिक संतुलन अकारण बिघडवतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT