म्हार्दोळ गोव्यातील एक निसर्गसंपन्न गाव, श्री देवी महालसा नारायणी देवस्थान आणि सुवासिक जायांची फुले ही या गावातील दोन वैशिष्ट्ये. राज्यातील प्रसिद्ध जायांची पूजा बांधली जाते ती याच गावात.
मार्दोळमधील जाई बागायतीवर बिल्डर लॉबीची नजर असून, सध्या त्या जागा बिल्डर लॉबीच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. जाई बागायतींना पावसाळ्यात रसायने घालून नामशेष करण्याचा घाट सध्या सुरू आहे, असा आरोप रेव्होलुशनरी गोवन्सने केला आहे.
रेव्होलुशनरी गोवन्सने म्हार्दोळ फुलकार समाजाच्या प्रश्नांबाबत सोमवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी रेव्होलुशनरी गोवन्सचे दक्षिण गोवा सचिव शैलेश नाईक, प्रियोळ मतदारसंघाचे आर.जी.पी प्रवक्ते गौरेश गावडे, रुपो जल्मि, फुलकार समाजाचे ज्येष्ठ सदस्य रमेश नाईक, राजेश नाईक, व तरुण शेतकरी डेंनी नाईक व आर.जी.पी. प्रियोळ मतदारसंघाचे सचिव शिवदास नाईक उपस्थित होते.
म्हार्दोळ गावात असलेल्या जाई फुलांच्या बागायतीना अज्ञाताकडून आग लावण्याच्या घटनांमुळे आज म्हार्दोळ मधील फुलकार समाज हवालदिल झालेला आहे. गेल्या विधानसभा अधिवेशनात आर.जी.पी चे सांत आंद्रे तील आमदार विरेश बोरकर यांनी हा विषय उपस्थित करून गोविंद गावडे तसेच राज्य सरकारला फुलकार समाजाला जमिनी हक्क देण्याचे आवाहन केले होते.
परंतु आजपर्यंत ह्या डबल इंजिन सरकारने त्या परीने काहीच केले नाही. आज राज्यातील बीजेपी सरकार हे डबल इंजिन सरकारकडून लोकांकरिता मोठमोठ्या योजना राबवित असल्याचे दाखविले जाते परंतु सामान्य जनतेसाठी वास्तविक पाहता काहीच हिताचे काम करताना दिसत नसल्याचे शैलेश नाईक यावेळी म्हणाले.
स्थानिक आमदार गोविंद गावडे, तसेच ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी पूर्णपणे ह्या फुलकार समाजाला न्याय देण्यात अपयशी ठरले आहे. फुलकार समाजाचे सदस्य जेव्हा लोकप्रतिनिधीकडे मदतीसाठी जातो तेव्हा त्यांना उडवाउडवची उत्तरे दिली जाते, ही अत्यंत दुःखाची गोष्ट असून, गोविंद गावडे हे ह्या कष्टकरी समाजाला न्याय देण्यात , त्यांना जमिनी हक्क देण्यात अपयशी ठरले आहे.
आतातरी राज्य सरकारने ह्या जमिनी फुलकार समाजाच्या नावावर कराव्या. त्यांच्या जळालेल्या बागायातीची नुकसान भरपाई द्यावी. व हे जाई पिकांची बागायती वारसा फुल पीक म्हणून घोषित करून त्यांचे संवर्धन करण्याचे प्रयत्न करावे, अशी मागणी गौरेश गावडे यांनी केली.
गावडे हे फुलकार समाजाला बहुजन समाजाला फक्त निवडणुकीवेळी वापर करतात. परंतु जेव्हा त्यांना हक्क देण्याची वेळ येते तेव्हा त्यांना न्याय देण्यात अपयशिंठरात आहे. खर तर त्यांनी निवडून येताच हे कष्टकरी समाजाचे प्रश्न मार्गी लावायला पाहिजे होते, परंतु तसे त्यांनी आजपर्यंत केले नाही. आपल्या राजकीय स्वार्थासाठी ते बहुजन समाजाचा वापर करत असल्याचा आरोप प्रियोळ मार्दोळचे ग्रामस्थ रुपो जलमी यांनी केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.