Ashtgandha Sahkari Patsanstha Scam Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud: 11.28 कोटींच्या अफरातफर प्रकरणी 'अष्टगंध संस्थे'च्या 4 माजी संचालकांना अटक, काहींवर टांगती तलवार; 'EOC'चा बडगा

Ashtgandha Sahkari Patsanstha: पीर्ण येथील अष्टगंध अर्बन क्रेडिट सहकारी संस्थेमध्ये सुमारे ११.२८ कोटींची संगनमताने अफरातफर केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे कक्षाने संस्थेच्या चार माजी संचालकांना अटक केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : पीर्ण येथील अष्टगंध अर्बन क्रेडिट सहकारी संस्थेमध्ये सुमारे ११.२८ कोटींची संगनमताने अफरातफर केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे कक्षाने (ईओसी) गुन्हा दाखल करून या संस्थेच्या चार माजी संचालकांना अटक केली.

आर्थिक गुन्हे कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संस्थेमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या ठेवीची रक्कम मुदत संपल्यानंतर व्याजासह परत करण्यास संस्था अपयशी ठरली होती. त्यामुळे फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी अगोदर प्रशासक तसेच ‘ईओसी’कडे तक्रार दाखल केली होती.

याप्रकरणी ‘ईओसी’कडून कोणतीच पावले उचलली जात नसल्याने संस्थेच्या काही गुंतवणूकदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, या संस्थेवर प्रशासक समिती नियुक्त करण्यात आली. संस्थेच्या आर्थिक व्यवहार व कारभाराची प्रथमदर्शनी तपासणी केली असता त्यामध्ये बरेच काळेबेरे असल्याचे आढळून आले.

२०२३ साली माजी संचालकांनी बनावट दस्तावेजाद्वारे काल्पनिकरित्या कर्ज दिल्याचे दिसून आले होते. त्यांनी संगनमताने, अप्रामाणिक हेतूने विविध बेकायदेशीर कृत्ये करून या संस्थेच्या निधीचा गैरवापर केला तसेच गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची तक्रार प्रशासक समितीचे अध्यक्ष मंगेश फडते यांनी दाखल केली होती.

संस्थेच्या माजी संचालकांमध्ये रवींद्र नाईक, दिगंबर परब, मोहनदास देसाई, श्रद्धा नाईक, प्रकाश एल. नाईक, प्रकाश व्ही. नाईक आणि प्रकाश ए. नाईक, सिरसई येथील कृष्णा हळर्णकर, चंद्रशेखर बर्वे, प्रकाश कांदोळकर आणि भारत परब यांचा समावेश आहे.

‘ईओसी’ने गुन्हा दाखल केल्यावर दिगंबर परब, मोहनदास देसाई, प्रकाश एल. नाईक, प्रकाश व्ही. नाईक, कृष्णा हळर्णकर, प्रकाश ए. नाईक आणि प्रकाश एन. कांदोळकर या माजी संचालकांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. मात्र, त्याला गुंतवणूकदारांनी आक्षेप घेतल्याने त्यांचे अर्ज फेटाळले होते.

त्यामुळे ‘ईओसी’चे पोलिस निरीक्षक रमेश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परेश रामनाथकर यांनी संस्थेचे माजी संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार फसवणूक तसेच संगनमताचा गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार ही कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT