Sal River In Goa  Dainik Gomantak
गोवा

साल नदीतील गाळ काढण्यास पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध

खारफुटी आणि परिसंस्थेचा नाश होत असल्याचे स्पष्टीकरण

दैनिक गोमन्तक

मडगाव: खारफुटी आणि परिसंस्थेचा नाश होत असल्याचे पुरावे देत, पर्यावरणवाद्यांनी साल नदीतील गाळ काढण्यास तीव्र विरोध केला आहे. गाळ काढणे हे अवैज्ञानिक असल्याचे त्यांनी सांगीतले. याच कारणामुळे सोमवारपासून गाळ काढण्याचे काम बंद करण्यात आले आहे. (Environmentalists strongly oppose sludge removal from Sal River in Goa)

मंगळवारी, रॉय बॅरेटो,पर्यावरणवादी (Environment) आणि पारंपारिक मच्छीमारांनी पत्रकारांसह येथील साइटला भेट दिली असता अशास्त्रीय पद्धतीने ड्रेजिंग केल्यामुळे पर्यावरणाचा नाश झाल्याचे दिसून आले. येत्या काही दिवसांत या विषयावर चर्चा करण्यासाठी इतर पर्यावरणवाद्यांसह सर्व संबंधितांची बैठक होणार आहे.

लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी पारंपरिक मच्छिमारांसह (Fishermen) साल नदीतील नदीतील गाळ काढण्याचे काम तात्काळ थांबवण्यासाठी संबंधितांच्या शिष्टमंडळाने कॅप्टन ऑफ पोर्ट्स (COP) आणि गोवा राज्य जैवविविधता मंडळ यांना निवेदन दिण्यात अले होते. शिष्टमंडळाने केलेल्या दाव्यानुसार, साल नदीच्या काठावर राहणारा मासेमारी समुदाय आपल्या उपजीविकेसाठी नदीवर अवलंबून आहे.

ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी

बॅरेटो म्हणाले की सीओपीने सर्व संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली आहे, परंतु त्याआधी पर्यावरणवादी आणि पारंपारिक मच्छीमार भविष्यावर चर्चा करण्यासाठी त्यांची अंतर्गत बैठक घेतील. तसेच ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याची मागणीही पारंपरिक मच्छीमारांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

SCROLL FOR NEXT