Goa News |Railway Route  Dainik Gomantak
गोवा

Goa Railway: गोव्यात रेल्वे मार्ग दुपदरीकरण प्रस्तावाला पर्यावरणप्रेमींचा कडाडून विरोध कारण...

गोव्यात कोळशाची वाहतूक वाढून पर्यावरणाचा ऱ्हास होणार, या भीतीने गोव्यात होऊ घातलेल्या रेल्वे मार्ग दुपदरीकरण प्रस्तावाला पर्यावरणप्रेमी विरोध करत आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Railway: गोव्यात कोळशाची वाहतूक वाढून पर्यावरणाचा ऱ्हास होणार, या भीतीने गोव्यात होऊ घातलेल्या रेल्वे मार्ग दुपदरीकरण प्रस्तावाला पर्यावरणप्रेमी विरोध करत आहेत. दुसऱ्या बाजूने काले ते सावर्डे दरम्यानच्या सुमारे 1.9 हेक्टर जमिनीत पूर्वी रेल्वे दुपदरीकरणावर घातलेली बंदी उठविण्याची शिफारस केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची प्रादेशिक अधिकारप्राप्त समितीकरू पाहात आहे.

त्यामुळे गोव्यातील पर्यावरण चळवळीतील कार्यकर्त्यांची घालमेल वाढली आहे. काले-सावर्डे मार्गावरील रेल्वेच्या दुहेरी मार्गासाठी या भागावरील स्थगिती रद्द करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे.

पर्यावरण कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध

यासंदर्भात पर्यावरण कार्यकर्ते अभिजीत प्रभुदेसाई म्हणाले की, हा रेल्वे मार्ग रुंदीकरणाचा प्रस्ताव तीन टप्प्यांत म्हणजे सावर्डे ते काले, काले ते कुळे आणि कुळे ते करंझोळ असा करण्याचा मूळ प्रस्ताव होता.

यातील फक्त सावर्डे ते कालेदरम्यानचा भाग जैवसंवेदनशील भागात येत नाही. अन्य दोन टप्पे संरक्षित वन क्षेत्रातून जात आहेत. त्यामुळे शेवटाच्या दोन टप्प्यांना पर्यावरणीय परवानगी मिळणे केवळ अशक्य आहे.

म्हादईचे खरे दुश्मन गोवा सरकारच

म्हादईचे आंदोलन पेटलेले असताना सावर्डे ते कालेदरम्यानच्या कामासाठी पूर्वी घातलेली बंदी उठवावी, अशी मागणी गोवा सरकार करते, हे अनाकलनीय आहे. म्हादईचे पाणी कर्नाटकात येणाऱ्या पोलाद कारखान्यांसाठी वळविले जात आहे.

त्याच कारखान्यांना कोळसा पुरविण्यासाठी रेल्वेचा विस्तार केला जात असून या प्रस्तावाला गोवा सरकारच मान्यता मागते. त्यामुळे म्हादईचे खरे दुश्मन गोवा सरकारच आहे, असे दुर्दैवाने म्हणावे लागते, असेही प्रभुदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीचा शुभ योग; 'या' 3 राशींवर राहिल श्रीकृष्णाची कृपा, परदेश प्रवासाचीही सुवर्णसंधी

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

SCROLL FOR NEXT