Environmental Awareness Dainik Gomantak
गोवा

Environmental Awareness : मुख्यमंत्री जेव्हा पर्यावरण जागृती फेरीत सहभाग होतात...

Environmental awareness : पर्यावरण दिनानिमित्त असल्याने विठ्ठलापूर येथील विठ्ठल रखुमाई सरकारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागृती फेरी काढली होती. या फेरीत विद्यार्थ्यांसमवेत शिक्षिका कल्पना गावस व इतर शिक्षिका सहभागी झाल्या होत्या.

गोमन्तक डिजिटल टीम

Environmental Awareness :

साखळी, झाडे लावा झाडे जगवा, अशा घोषणा देत विठ्ठलापूर साखळी भागात पर्यावरण दिनानिमित्त विठ्ठल रखुमाई सरकारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या जागृती फेरीत अचानक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सहभगी होत विद्यार्थ्यांबरोबर शिक्षिकांनाही सुखद धक्का दिला.

या फेरीत सहभागी झालेल्या मुख्यमंत्र्यांनी झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश दिला.

पर्यावरण दिनानिमित्त असल्याने विठ्ठलापूर येथील विठ्ठल रखुमाई सरकारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागृती फेरी काढली होती. या फेरीत विद्यार्थ्यांसमवेत शिक्षिका कल्पना गावस व इतर शिक्षिका सहभागी झाल्या होत्या.

शाळेपासून काही अंतरावर ही फेरी आली असता, या विद्यार्थ्यांना पोलिसांची एक गाडी आपल्या बाजूला येताना दिसली. मागे मुख्यमंत्र्यांची गाडी होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गाडीतून उतरले व विद्यार्थ्यांबरोबर फेरीत सहभागी झाले. हा क्षण सर्वांनाच सुखद धक्का देणारा होता.

यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही "झाडे लावा झाडे वाचवा" अशी घोषणा दिली. या घोषणेलाही विद्यार्थ्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT